जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Coronavirus Outbreak दरम्यान सोनाक्षी करतेय पार्टी? Video पाहून नेटिझन्स भडकले

Coronavirus Outbreak दरम्यान सोनाक्षी करतेय पार्टी? Video पाहून नेटिझन्स भडकले

Coronavirus Outbreak दरम्यान सोनाक्षी करतेय पार्टी? Video पाहून नेटिझन्स भडकले

सोनाक्षी सिन्हानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती पार्टीमध्ये डान्स करताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 मार्च : सध्या सगळीकडेच कोरोनो व्हायरसनं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. याचा प्रबाव सामान्य जनता ते सेलिब्रेटीपर्यंत सर्वांवरच पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटीनी त्यांच्या सिनेमांचं शूटिंग रद्द केलं असून सध्या ते घरी राहून त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. पण या सर्वात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मात्र ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओमुळे सोनाक्षीला जोरदार ट्रोल केलं जात आहे. सोनाक्षी सिन्हानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती पार्टीमध्ये डान्स करताना दिसत आहे. सोनाक्षीनं हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही वेळातच तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करायला सुरुवात झाली. पण या व्हिडीओमागचं सत्य मात्र वेगळंच आहे. सोनाक्षीनं कमेंट बॉक्समध्ये याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही तिला ट्रोल करण्यात आलं ज्यामुळे तिचा भाऊ लव सिन्हा तिच्या मदतीला धावून आला. फ्रेंड्ससोबत आलिया करत होती TikTok Video, पण झाली ‘गलती से बिग मिस्टेक’

जाहिरात

सोनाक्षीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला ज्यात ती एका ग्लॅमरस ड्रेस डान्स करताना दिसत आहे. धम्माल करण्याच्या मूडमध्ये असलेली सोनाक्षी पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सोनाक्षीनं लिहिलं, ‘हा #WorldHappinessDay आहे आणि डान्समुळे मला खूप आनंद मिळतो. चला सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाशी लढूयात. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी काहीतरी शोधूयात, काही असं जे आपण घरी राहूनही करू शकतो. जनता कर्फ्यूच्या माध्यामातून आपण एक चांगलं पाऊल उचललं आहे. घरी राहा, पॅनिक होऊ नका. वयोवृद्धांची मदत करा. डॉक्टरांचा सल्ला पाळा.’ Corona पॉझिटीव्ह आहे कनिका कपूर, लंडनला जाऊन कोणाला भेटली गायिका खरं तर सोनाक्षीनं या व्हिडीओतून घरी राहा, पार्टी-इव्हेंटमध्ये सहभागी होऊ नका. असा सल्ला दिला आहे मात्र तिच्या या व्हिडीओवरुन तिलाच ट्रोल करण्यात आलं आहे. एक युजरनं लिहिलं, जर तूया सर्व गोष्टींचं पालन करत नाहीस तर मग आम्हाला उपदेश देऊ नकोस. ट्रोलर्सनी सोनाक्षीला एवढं त्रास दिला की तिला स्वतःहून त्यांना उत्तर द्यावं लागलं. तिनं कमेंटमध्ये लिहिलं, मी घरीच आहे, मूर्खा, हा व्हिडीओ खूप जुना आहे. याशिवाय सोनाक्षीच्या या पोस्टवर तिचा भाऊ सुद्धा अनेकांना उत्तर देताना दिसला. मात्र यावरुन लव सिन्हाला सुद्धा पर्सनली ट्रोल करण्यात आलं आहे. अमेय वाघ होम क्वारंटाईन! शेअर केला अमेरिकेतून परतल्यानंतरचा एअरपोर्टवरील अनुभव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात