…म्हणून आमिर खाननं राणी मुखर्जीची फोनवरुन मागितली माफी

…म्हणून आमिर खाननं राणी मुखर्जीची फोनवरुन मागितली माफी

सिनेमाच्या सेटवर असं काही घडलं ज्यामुळे आमिर खानला फोन करुन राणी मुखर्जीची माफी मागावी लागली.

  • Share this:

मुंबई, 21 मार्च : बॉलिवूडची मर्दानी राणी मुखर्जीचा आज 42 वा वाढदिवस 16 व्या वर्षी बॉलिवूडच्या दुनियेत पाऊल ठेवणारी राणी आज आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. पण तिच्या करिअरचा एक काळ असाही होता ज्यात तिला तिच्या अपीयरेंस पासून ते आवाजापर्यत सर्वच गोष्टींसाठी सर्वांचे टोमणे ऐकावे लागले होते. त्यावेळीच एका सिनेमाच्या सेटवर असं काही घडलं होतं. ज्यामुळे आमिर खाननं स्वतः राणीला फोन करुन तिची माफी मागितली होती.

राणी मुखर्जीनं तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 1997 मध्ये आलेल्या ‘राजा की आयेगी बारात’ या सिनेमातून केली होती. हा सिनेमा तर फ्लॉप राहिला. मात्र राणीच्या करिअरची गाडी मात्र सुरू झाली. पण तिला नेहमीच तिच्या आवाजावरून सर्वांचे टोमणे ऐकावे लागत असत आणि सर्वात वाईट गोष्ट ही होती की तिच्याच सिनेमात तिचा आवाज कुठल्या तरी दुसऱ्याच व्यक्तीकडून डब करुन वापरला जात आहे. असंच काहीसं झालं आमिर खान आणि राणी मुखर्जीच्या ‘गुलाम’ सिनेमाच्या दरम्यान. या सिनेमातही राणीचा आवाज डब करण्यात आला होता.

Corona पॉझिटीव्ह आहे कनिका कपूर, लंडनला जाऊन कोणाला भेटली गायिका

राणीच्या करिअरमधील तो काळ खूप कठीण होता. पण त्यावेळी राणीच्या आवाजावर विश्वास दाखवला तो दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरनं. ‘कुछ कुछ होता है’मध्ये राणीचा ओरिजिनल आवाज वापरण्यात आला आणि आमिर खानसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या सिनेमातील तिचा आवाज खरोखरच वेगळा आणि दमदार वाटत होता. त्यानंतर आमिरनं राणीला कॉल करुन सिनेमातील तिचा आवाज आणि अभिनयाचं कौतुक तर केलच. मात्र या सोबतच ‘गुलाम’ सिनेमाच्या वेळी तिच्यावर विश्वास न दाखवल्याबद्दल माफीही मागितली.

अमेय वाघ होम क्वारंटाईन! शेअर केला अमेरिकेतून परतल्यानंतरचा एअरपोर्टवरील अनुभव

राणी मुखर्जीनं एका मुलाखती दरम्यान हा किस्सा स्वतः शेअर केला. तिनं सांगितलं, मला त्यावेळी बोलताना त्रास होत असे. मी व्यवस्थित बोलू शकत नसे. पण मी ही गोष्ट कोणासमोर येऊ दिली नाही. या शिवाय राणीला तिच्या कमी असेल्या उंचीवरूनही अनेकदा ऐकावं लागलं मात्र तिनं यावरही मात करत स्वतःची अशी जागा तयार केली की आज अभिनयाच्या बाबतीत तिचा हात कोणीच पकडू शकत नाही आणि याचा प्रत्यय सर्वांनाच ‘मर्दानी 2’ सिनेमाच्या वेळी आला.

Corona पसरवणाऱ्या कनिका कपूरच्या अटकेची मागणी, होऊ शकते कठोर शिक्षा

First published: March 21, 2020, 8:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading