देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीच्या किंमती वाढल्या, जाणून घ्या काय आहेत दर

देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीच्या किंमती वाढल्या, जाणून घ्या काय आहेत दर

राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 मे : लॉकडाऊनमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये आज (Gold and Silver Prices Today) काहीसा बदलाव पाहायला मिळाला. अमेरिका-चीनमधील हाँग काँगवरून कलह वाढत आणि देशात कोरोना बाधितांमध्ये देखील वाढ झाली आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावर झालेला पाहायला मिळाला. सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये शुक्रवारी वाढ झाली आहे. राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते.

एमसीएक्स एक्सचेंजवर (MCX Exchange) जुनसाठी सोन्याची किंमत 0.34 टक्क्यांनी वाढली असून सोनं 46,565 रुपये प्रति तोळा किंमतीवर पोहोचलं आहे. जुलैसाठी चांदीची किंमत  0.3 टक्क्यांनी वाढून 48,710 रुपये प्रति किलो झाली आहे. या महिन्यात सोन्याच्या किंमतीनी उच्चांक गाठला होता.

(हे वाचा-घरबसल्या 10 मिनिटांत मोफत बनवू शकता PAN, अर्थमंत्र्यांनी लाँच केली नवी योजना)

सोन्याच्या किंमतीने 47,980 रुपये प्रति तोळा हा आकडा गाठला होता. सध्या देशातील सराफा बाजार लॉकडाऊनमुळे बंद आहेत. मात्र सोन्याच्या किंमतीमध्ये चढउतार कायम आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आज सोन्याच्या किंमती 1,719.63 डॉलर प्रति औंस आहेत.

भविष्यात काय राहणार सोन्याच्या किंमती?

जगभरात झालेल्या अनेक रिसर्च अहवालांच्या मते सोन्यामध्ये पुढील काही महिन्यामध्ये गुंतवणूक कायम राहील. पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याची किंमत 54000 रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

1. सोन्याच्या शुद्धतेनुसार सोन्याचे दागिने सुद्धा वेगवेगळ्या कॅरेटमध्ये येतात. 24 कॅरेट सोनं सगळ्यात शुद्ध सोनं असतं. 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये 91.6 टक्के सोन्याची शुद्धता असते.

(हे वाचा-पर्दाफाश: IED स्फोटकांनी भरलेल्या त्या कारचा मालक हिजबुलचा दहशतवादी)

2. सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती दोन गोष्टींवरून ठरतात- एक म्हणजे दागिन्यामध्ये सोन्याचा हिस्सा काय आहे. उदा. 22 कॅरेट की 18 कॅरेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दागिने बनवण्यासाठी सोन्यामध्ये मिसळण्यात येणारा धातू.

First published: May 29, 2020, 4:34 PM IST

ताज्या बातम्या