प्रख्यात कवी योगेश यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन, 'जिंदगी कैसी ये पहेली' सारख्या अजरामर गाण्यांचे गीतकार

प्रख्यात कवी योगेश यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन, 'जिंदगी कैसी ये पहेली' सारख्या अजरामर गाण्यांचे गीतकार

'कही दूर जब दिन ढल जाए', 'जिंदगी कैसी ये पहेली' या 'आनंद' चित्रपटातील गाण्यांसाठी कवी योगेश प्रसिद्ध होते. यासारखी अनेक अजरामर गाणी त्यांनी बॉलिवूडला दिली.

  • Share this:

मुंबई, 29 मे : प्रख्यात कवी आणि गीतकार योगश यांचे आज निधन झाले. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहत कवी योगेश यांना श्रद्धांजली वाहिली. 'योगेश' अशा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या प्रसिद्ध गीतकाराचे पूर्ण नाव योगेश गौर असे होते. त्यांच्या जन्म 19 मार्च 1943 मध्ये झाला होता. आज वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'कही दूर जब दिन ढल जाए', 'जिंदगी कैसी ये पहेली' या 'आनंद' चित्रपटातील गाण्यांसाठी कवी योगेश प्रसिद्ध होते.

लतादीदींनी त्यांच्या पोस्टमध्ये कवी योगेश यांना'हृदयाला भिडणारे गीत लिहणारे कवी योगेश' असे संबोधले आहे. लतादीदींनी यामध्ये असंही म्हटलं आहे की कवी योगेश यांनी लिहिलेली अनेक गाणी त्यांनी गायली होती.

(हे वाचा-अक्षय कुमारचा बहुचर्चित 'लक्ष्मी बॉम्ब' देखील OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार)

कवी योगेश यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील लखनऊ याठिकाणी झाला होता. 'कही दूर जब दिन ढल जाए', 'जिंदगी कैसी ये पहेली', 'रिमझिम गिरे सावन' यासारखी सदाबहार गाणी लिहण्याबरोबरच त्यांनी काही टेलिव्हिजन मालिकांसाठी लेखक म्हणून देखील काम केले होते.

First published: May 29, 2020, 4:59 PM IST
Tags: anand

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading