जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sourav Ganguly Biopic: सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये 'हा' अभिनेता करणार रणबीर कपूरला रिप्लेस?

Sourav Ganguly Biopic: सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये 'हा' अभिनेता करणार रणबीर कपूरला रिप्लेस?

सौरव गांगुली बायोपिक

सौरव गांगुली बायोपिक

लवकरच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा जीवनपटही मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. या बायोकपिकमध्ये रणबीर कपूर सौरव गांगुलीची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता याविषयी मोठी अपडेट समोर आली असून बॉलिवूडच्या एका अभिनेत्याने रणबीर कपूरला रिप्लेस केल्याची बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 मे : रणबीर कपूर नुकताच ‘तू झूठी मै मक्कार’ चित्रपटात दिसला होता. संजू’ च्या भरघोस यशानंतर रणबीर कपूर पुन्हा बायोपिकमध्ये दिसणार असून तो  लोकप्रिय क्रिकेटर  सौरव गांगुलीची भूमिका साकारणार असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक खेळाडूंवर बायोपिक बनवण्यात आले आहेत. आता लवकरच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा जीवनपटही मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. या बायोकपिकमध्ये रणबीर कपूर सौरव गांगुलीची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता याविषयी मोठी अपडेट समोर आली असून बॉलिवूडच्या एका अभिनेत्याने रणबीर कपूरला रिप्लेस केल्याची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीच्या चरित्रावर आधारित चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम पूर्ण झाले आहे. आता लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार अशी माहिती मिळाली होती.  पण त्यांची भूमिका नेमकं कोण साकारणार याविषयी संभ्रम होता. सौरव गांगुलींनी रणबीरला पसंती दिल्याचं समजलं होतं. पण आता रणबीर ऐवजी या चित्रपटात आयुष्यमान खुराणाच नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

बातम्यांवर विश्वास ठेवला तर आयुष्मान खुराना मोठ्या पडद्यावर ‘सौरव गांगुली’ बनू शकतो. भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर बनत असलेल्या या चित्रपटासाठी निर्मात्यांनी त्याला कास्ट केल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असल्याची आणखी एक बातमी समोर येत आहे. CSK च्या विजयानंतर सारा अली खान नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; तर एमएस धोनीला ‘या’ सेलेब्सनी दिल्या शुभेच्छा एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की ‘लव फिल्म्स’ त्याची निर्मिती करत आहे आणि आयुष्मान खुराना या चित्रपटासाठी काही काळापासून चर्चेत आहे. सूत्राने दावा केला आहे की, ‘मेकर्स अनेक महिन्यांपासून आयुष्मानसोबत या चित्रपटाची चर्चा करत आहेत. चर्चा आता चांगल्या टप्प्यावर पोहोचली आहे आणि अधिकृतपणे स्वाक्षरी करण्यापूर्वी काही औपचारिकता पूर्ण कराव्या लागणार आहेत. सौरव गांगुलीच्या भूमिकेसाठी डावखुरा फलंदाज असलेला आयुष्मान हाच सर्वोत्तम पर्याय असल्याची त्याला खात्री आहे. सूत्राने असेही म्हटले आहे की, ‘सौरव गांगुलीने आयुष्मानच्या बायोपिकसाठी कास्टिंगला मान्यता दिली आहे आणि लवकरच त्याला वैयक्तिकरित्या भेटणार आहे. शूटिंग सुरू करण्यापूर्वी आयुष्मानला क्रिकेटचे प्रशिक्षणही घ्यावे लागेल, जे काही महिने टिकेल. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवणे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, त्याने ही ऑफर फेटाळून लावली असून ऐश्वर्या रजनीकांतच्या दिग्दर्शनासाठी विचार केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात