मुंबई, 22 जानेवारी: बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी सध्या क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. दोघे येत्या 23 जानेवारीला लग्नगाठ बांधणार आहेत. आता त्याआधी तयारी जोरात सुरु असून त्यांच्या लग्नमंडपाचे फोटो समोर आले आहेत. अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नापूर्वीच्या विधी मोठ्या थाटात पार पडत असताना अभिनेते सुनील शेट्टी यांनी लेकीच्या लग्नाबद्दल मोठी माहिती दिली आहे. लग्नाच्या एक दिवसआधी सुनील यांनी अथियाच्या लग्नाबद्दल मराठीत माहिती दिली आहे. सध्या त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत.
या व्हिडिओमध्ये सुनील शेट्टींच्या खंडाळ्याच्या घराबाहेर काही पापाराझी जमलेले आहेत. तेव्हाच सुनील शेट्टींची गाडी येते. पापाराझींना पाहिल्यानंतर सुनील शेट्टी गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाबद्दल मराठीत माहिती दिली. ‘उद्या मुलांना समोर घेवून येईल..तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद. शिवाय पुढे सुनील शेट्टी मराठी मध्ये म्हणाले, ‘उद्या अथिया राहुल यांच्यासोबत प्रत्येक जण समोर येणार तेव्हा जे विचारयचं आहे ते विचारा…’ असं म्हणत अभिनेत्याने लेकीच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला. त्यांचा साधेपणा पाहून सगळेच भारावले आहेत.
हेही वाचा - अथिया-के.एल.राहुल च्या लग्नाचा मंडप सजला! सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यावर जय्यत तयारी सुरु
अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना 21 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्याची सुरुवात सजावटीपासून झालेली दिसून येत आहे. 23 जानेवारी रोजी हे दोघे लग्नगाठ बांधणार आहेत. लग्नासाठी फक्त 100 पाहुण्यांची यादी तयार कण्यात आली असल्याचं कळत आहे. अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीमध्ये सलमान खान, विराट कोहली, अनुष्का शर्मा, जॅकी श्रॉफ पासून अक्षय कुमार पर्यंत सेलिब्रिटींना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. शिवाय लग्नात हजर राहणाऱ्या सेलिब्रिटींना काही अटींचं पालन करावं लागणार आहे.
View this post on Instagram
अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचं लग्न इतर कुठे नव्हे तर खंडाळामध्ये होणार आहे. अथियाचे वडील सुनील शेट्टी यांच्या या खंडाळा बंगल्यात हे जोडपं लग्नगाठ बांधणार आहे. आता या खंडाळ्याच्या घराचे फोटो समोर आले आहेत. तेथे या दोघांच्या लग्नाचा मंडप सजला आहे. फारच कमी लोकांना माहिती असेल की अभिनेता सुनील शेट्टीचा खंडाळा फार्महाउस अतिशय भव्य आणि आलिशान आहे. अर्थातच या लव्ह बर्ड्सचा विवाहसोहळासुद्धा तितकाच खास आणि भव्य असणार आहे.
पाहुण्यांना लग्नात फोटो काढता येणार नाहीत. फोन सोहळ्यापासून दूर ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय अनेक बॉलिवूडकरांना लग्नाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या काही आठवड्यांनी सेलिब्रिटींलाठी मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. आता प्रत्येकाला अथिया आणि केएल राहुल यांना पती-पत्नीच्या रुपात पाहण्याची इच्छा चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment, Kl rahul, Sunil shetty