मुंबई, 31 डिसेंबर : 2022 हे वर्ष संपायला आता काही तास शिल्लक आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्या कुटुंबाबरोबर न्यू इअर सेलिब्रेशन करत आहेत. बॉलिवूडसाठी हे वर्ष फारसं चांगलं गेलं नाही. अर्ध्या वर्षात बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडमध्ये होतं. या ट्रेंडचा अनेक सिनेमांना मोठा फटका बसला. 2022च्या शेवटची काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर तग धरू शकले. पण येणारं 2023 हे नवं वर्ष बॉलिवूडसाठी कसं जाईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. अनेक सुपरस्टार्सचे सिनेमे नव्या वर्षात प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. मात्र ज्योतिष बॉलिवूडबद्दल काय भविष्यवाणी केलीये जाणून घेऊया. बॉलिवूड बफ आणि न्यूमरोलॉजिस्ट भाविक सांघवी यांनी म्हटलं आहे की, 2023वर्षात बॉलिवूडसाठी 7 हा आकडा लकी असेल. हा आकडा फार मूडी, क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक असतो. ज्या कलाकारांचा बर्थ 1,2,4 आणि 7 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष शुभ असेल. हेही वाचा - Laal singh Chaddha: बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होऊनही आता ट्विटरवर ट्रेंड होतोय आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’; हे आहे कारण अभिनेता शाहरुख खानचा पठाण सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होतोय. शाहरुखसाठी 2023साठी जबरदस्त असणार आहे. त्याचप्रमाणे शाहरुखचा डंकी 22 डिसेंबर 2022ला चांगली कमाई करू शकतो. पण दीपिकाला मात्र पठाण सिनेमाचा काहीच फायदा होणार नाही. पठाणमुळे दीपिका ऐवजी शाहरुख खान लाइमलाइटमध्ये येईल. त्यानंतर अभिनेता कार्तिक आर्यसाठीही 2023 कमाल असणार आहे. कार्तिकच्या सत्यप्रेम की कथा सिनेमाची रिलीज डेट शिफ्ट होईल पण त्याचा त्याला खूप फायदा होईल. तसंच अभिनेता अजय देवगण देखील भोला और मैदान सिनेमाची रिलीज डेट शिफ्ट करू शकला तर त्याला फायदा होऊ शकतो. तर अभिनेता अक्षय कुमारला 2022 हे वर्ष फार वाईट गेलं. पण 2023ही अक्षयसाठी तितकंस खास असेल नाही. वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमावरून अक्षयवर टीकेची झोड उठू शकते. हेही वाचा - Prabhas: ‘बाहुबली’ प्रभास नक्की कोणाच्या प्रेमात? रामचरणने अखेर सांगूनच टाकलं ज्योतिषानं सलमान खानबाबत म्हटलंय, सलमानची किसी का भाई किसी की जान हा सिनेमाची रिलीज डेट ईदच्या मुहूर्तावरून आऊट होईल. सलमानकडून यावेळी ईद कोणतंही सप्राइज प्रेक्षकांना मिळणार नाही. तर दुसरीकडे विक्की कौशलचा सॅम बाहादूर हा सिनेमा तगडी कमाई करेल. विक्कीला या सिनेमासाठी नॅशनल अवॉर्डही मिळू शकतो. अभिनेत्री कृती सेननचं भविष्य आदिपुरूष या सिनेमावरून ठरणार आहे. सिनेमामुळे कृतीला काहीच फायदा होणार नाही असं ज्योतिषांनी म्हटलं आहे. 2023मध्ये बॉलिवूडकरांकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. पण बॉलिवूडची परिस्थिती अशीच पाहिली बॉयकॉट बॉलिवूडचा ट्रेंड कायम राहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.