जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ...म्हणून अशोक मामांनी कोठारेंच्या कार्यक्रमाला येणं टाळलं; निवेदितांनी सांगितलं नेमकं कारण

...म्हणून अशोक मामांनी कोठारेंच्या कार्यक्रमाला येणं टाळलं; निवेदितांनी सांगितलं नेमकं कारण

अशोक सराफ महेश कोठारे

अशोक सराफ महेश कोठारे

अशोक सराफ यांची प्रकृती ठिक नसल्यानं ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत असं अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सांगितलं. अशोक सराफ यांना नक्की काय झालं आहे पाहूया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  11 जानेवारी : मराठी सिनेमात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करणार सर्वांचे लाडके अभिनेते महेश कोठारे . अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून महेश कोठारे यांनी मराठी सिनेक्षेत्रात नाव कमावलं. ‘डॅम इट’ हा त्यांचा प्रसिद्ध डायलॉग प्रेक्षक आणि सिनेक्षेत्रातील मंडळी कधीही विसरू शकत नाही. महेश कोठारे यांचा जीवनप्रवास सांगणारं डॅमइट आणि बरंच काही हे आत्मचरित्र्य नुकतंच प्रकाशित झालं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. सिनेक्षेत्रातील दिग्गज मंडळी या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होती. महेश कोठारे यांच्याबरोबर अनेक सिनेमात कामं केलेले अभिनेते सचिन पिळगाकर देखील आले होते. मात्र महेश कोठारेंच्या अनेक सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारे सर्वांचे लाडके अशोक मामा अर्थात अशोक सराफ मात्र कार्यक्रमाला आले नव्हते. अशोक सराफ यांची प्रकृती ठिक नसल्यानं ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत असं अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सांगितलं. अशोक सराफ यांना नक्की काय झालं आहे पाहूया. महेश कोठारे यांच्या डॅम इट आणि बरंच काही या पुस्तकाराचा प्रकाशन सोहळा  दादर येथील श्री शिवाजी मंदिरमधील भव्य सभागृहात संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी रिमोटचे बटण दाबून अनोख्या शैलीत ‘डॅम ईट आणि बरंच काही’ पुस्तकाचे प्रकाशन केलं.   किरण शांताराम, सचिन पिळगावकर , निवेदिता सराफ, मच्छिंद्र चाटे, जयवंत वाडकर, रामदास पाध्ये, उमेश जाधव आदी मंडळींनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र या सगळ्यांमध्ये अभिनेते अशोक सराफ यांची अनुपस्थिती प्रामुख्यानं लक्षात आली. पण अशोक मामा कार्यक्रमाला न येण्यामागचं कारण निवेदिता सराफ यांनी सांगितलं. हेही वाचा - Mahesh Kothare Autobiography: ‘डॅम इट’ला मिळाला हक्काचा कॉपी राईट; महेश कोठारेंचं आत्मचरित्र्य प्रकाशित

कार्यक्रमात सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी महेश कोठारेंबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.  तेव्हा प्रश्न उत्तर सुरू होण्याआधी निवेदिता म्हणाल्या, अशोक इथे नाहीये याचं वाईट वाटत आहे. पण त्याला लँरेंजायटिस झालाय. त्याला नीट बोलता येत नाहीये. त्यामुळे आम्ही नाटकांचे पुढचे प्रयोगही रद्द केलेत. त्याचप्रमाणे निवेदिता यांनी अशोक मामांचा निरोपही महेश कोठारेंपर्यंत पोहोचवला. त्या म्हणाल्या, आज अशोक इथे उपस्थित नसला तरी तो मित्र म्हणून कायम तुझ्या पाठीशी उभा आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अशोक सराफ काही दिवसांआधीच पुण्यात एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात बोलताना देखील अशोक सराफ यांचा आवाज बदलल्या सारखा भासत होता. त्याचप्रमाणे त्यांना बोलण्यात त्रासही होत असल्याचं जाणवलं होतं. अशोक सराफ सध्या वॅक्युम क्लिनर नावाचं एक नाटक करत आहेत. अभिनेत्री निर्मिती सावंत याच अशोक मामांबरोबर मुख्य भूमिकेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात