जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Happy Birthday Nivedita Saraf: चिडीचूप बुकस्टोरमध्ये निवेदिता सराफ यांनी का मारली होती जोरदार शिट्टी?

Happy Birthday Nivedita Saraf: चिडीचूप बुकस्टोरमध्ये निवेदिता सराफ यांनी का मारली होती जोरदार शिट्टी?

Happy Birthday Nivedita Saraf: चिडीचूप बुकस्टोरमध्ये निवेदिता सराफ यांनी का मारली होती जोरदार शिट्टी?

मराठी चित्रपटसृष्टीतील एक चार्मिंग अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) त्यांच्या वयाच्या साठीच्या आसपास पोहोचूनही आज एकदम फिट आणि सुंदर आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातला काही भन्नाट गोष्टी.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 5 जून: ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांच्या अभिनयाची जादू आजही टिकून आहे. प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या या अभिनेत्रीचा 6 जून रोजी वाढदिवस (Nivedita Saraf Birthday) असतो. आपल्या कमाल अभिनयशैलने निवेदिता सराफ यांनी एक काळ गाजवला आहे. त्यांच्या या एवढ्या मोठ्या जीवनकाळात काही कमाल किस्से सुद्धा घडले आहेत.   निवेदिता सराफ या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी आहेत. (Nivedita Saraf & Ashok Saraf) अशोक आणि निवेदिता यांनी तब्ब्ल दोन दशक आपल्या चित्रपटांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. नुकताच अशोक मामांचा 75 वा वाढदिवस 4 जून रोजी साजरा करण्यात आला. आपल्या नवऱ्याच्या पाठोपाठ लागूनच निवेदिता यांचा उद्या वाढदिवस आहे. दोघांचं वेगळं स्थान जरी असलं ते कायमच एक आहेत याची जणिव होत राहते. या दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटापासून झाली. गेली अनेक वर्ष हे जोडपं प्रेमाने एकमेकांसोबत राहत आहे. त्यांना अनिकेत नावाचा मुलगा आहे.   स्क्रीनवर एवढ्या विविधांगी भूमिका साकारणाऱ्या निवेदिता खऱ्या आयुष्यात मात्र कधीकधी फार गंमतशीर वागतात. झी मराठीवरील ‘कानाला खडा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांच्या मुलाने एक भन्नाट किस्सा सांगितला होता. निवेदिता यांच्यामुळे अनिकेतला खूप मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं.   अनिकेत सांगतो,”मी आईसोबत एका पुस्तकाच्या दुकानात गेलो होतो. लायब्ररी सारखं असणारं ते दुकान साहजिकच फार शांत होतं. मी अगदीच १०-१२ वर्षांचा होतो आणि आम्ही दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पुस्तक पाहत होतो. त्यावेळी तिला मला हाक मारायची होती पण कशी मारणार अश्या संभ्रमात तिने माझं नाव घेऊन मला न बोलवता जोरात शिट्टी मारली. आणि त्या शांत जागेत तो आवाज एवढा जोरात आला की मला अक्षरशः शरम वाटली. सगळेजण आमच्या दोघांकडे विचित्र नजरेने पाहत होते.” News18 त्यांचा हा किस्सा ऐकून त्यांना सुद्धा मधूनच गंम्मत करण्याचा मोह टाळता येत नाही हे जाणवतं. या कार्यक्रमाचा संपूर्ण भाग झी 5 वर उपलब्ध आहे. निवेदिता सराफ या एक जबाबदार आई आहेत. हे ही वाचा-   कुशल बद्रिकेची मराठी सोडून गुजराती भाषेत पोस्ट करण्यामागं काय आहे कारण?

 त्यांचा हा जबाबदारपणा अगंबाई सासूबाई या मालिकेतून सगळ्यांनाच दिसला. एखाद्या स्त्रीने आपल्या पायावर उभं राहावं आणि आनंदाने आयुष्य जगावं असा संदेश या मालिकेतून देण्यात आला होता. त्यांचं या मालिकेतील काम सगळ्यांना फारच आवडलं.  

निवेदिता खऱ्या आयुष्यात एक यशस्वी आई, अभिनेत्री, उद्योजिका, शेफ आहेत. त्यांच्या रेसीपीचे व्हिडिओस सुद्धा फार पसंत केले जातात. त्या सध्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत दिसत आहेत. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात