जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ashok Saraf Birthday: 'त्यांना प्रचंड वेदना होत होत्या तरी...चिन्मय मांडलेकरने सांगितला होता मामांचा इमोशनल किस्सा

Ashok Saraf Birthday: 'त्यांना प्रचंड वेदना होत होत्या तरी...चिन्मय मांडलेकरने सांगितला होता मामांचा इमोशनल किस्सा

Ashok Saraf Birthday: 'त्यांना प्रचंड वेदना होत होत्या तरी...चिन्मय मांडलेकरने सांगितला होता मामांचा इमोशनल किस्सा

आज मामा आपला 75 वा वाढदिवस (75th Birthday) साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्यांचा एक असा किस्सा वाचणार आहोत. ज्यामुळे त्यांची आपल्या कामावरती असलेली निष्ठा दिसून येईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 जून-   मराठी चित्रपटसृष्टीतील  (Marathi Film Industry) ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता अशोक सराफ (Ashok Saraf) सर्वांनाचं आपलेसे वाटतात. अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांना विनोदाचा बादशहा म्हणून ओळखलं जातं. अशोक सराफ यांनी नेहमीचं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. ते का एक ग्रेट अभिनेता आहेत. हे आपल्याला समजेल. आज मामा आपला 75 वा वाढदिवस   (75th Birthday)  साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्यांचा एक असा किस्सा वाचणार आहोत. ज्यामुळे त्यांची आपल्या कामावरती असलेली निष्ठा दिसून येईल. मामांनी चित्रपटांसोबतचं अनेक नाटकांमध्येसुद्धा काम केल आहे. मामा एक उत्तम कलाकार आहेत. हे आपण सर्वचजण जाणतो. मात्र मामा एक उत्तम माणूससुद्धा आहेत. आणि ते सतत इतरांचा विचार आधी करतात, हे आपल्याला समजून येईल. काही वर्षांपूर्वी ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाचं तालीम सुरु होतं तेव्हाचा हा किस्सा आहे. ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाची तालीम अगदी शेवटच्या टप्प्यावर आली होती. त्यामुळे सर्वच कलाकार अगदी जोमाने तयारी करत होते. मामासुद्धा आपल्या नेहमीच्या उत्सहाने तालीम करत होते. मात्र एकेदिवशी अचानक त्यांच्यामध्ये थोडासा बदल जाणवू लागला. आणि ही गोष्ट हेरली नाटकाचे दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी. मात्र अनेकवेळा विचारणा करूनसुद्धा मामांनी नेमकं कारण नाही सांगितल. मामा तसचं आपला सराव करत राहिले. मात्र चिन्मयने मामांच्या ड्रायव्हरला याबद्दल विचारलं आणि तेव्हा त्याला समजलं, की मामांच्या मानेपासून पाठीत एक मोठी कळ आली होती. (हे वाचा: Happy 75th Birthday Ashok Saraf: शाहरुख, सलमानला लाजवेल अशी कारकीर्द असलेला मराठीतला एकमेव सुपरस्टार, आजही करतात जोशात काम **!)** आणि त्यामुळे मामांची मान खूपच दुखत आहे. त्यांना प्रचंड वेदना होतं आहेत. तसेच मामांना वरचेवर असं होतं, म्हणून ते आपल्या सोबत एक बाम ठेवतात. मात्र हा बाम असूनसुद्धा त्यांनी त्याचा वापर केला नव्हता. याबद्दल मामांना एका मुलाखती दरम्यान विचारलं असता, त्यांनी थक्क करणारं कारण सांगितलं. मामा म्हणाले, ‘माझ्याजवळ जो बाम आहे, त्याला खुपचं उग्र असा वास आहे. आणि इथे तालीम करणाऱ्या सर्व कलाकारांना त्याचा वास सहन होणार नाही. त्यांना तो वास सहन करत आपलं काम करावं लागेल. त्यांना विनाकारण त्याचा त्रास होईल. म्हणून मी तो बाम लावायचं टाळलं’. अशोक सराफ यांचं हे उत्तर ऐकून सर्वचजण थक्क झाले होते. कारण स्वतःला वेदना होतं असताना इतरांचा विचार करणारा माणूस किती निस्वार्थी आणि थोर असू शकतो. म्हणूनचं मामा एक उत्तम कलाकारासोबत एक थोर माणूससुद्धा आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात