जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मुस्लिम आईबापांच्या पोटी जन्म तरी हिंदू म्हणून मिळवली प्रसिद्धी; या गोष्टीमुळं आयुष्यभर एकटीच राहिली अभिनेत्री

मुस्लिम आईबापांच्या पोटी जन्म तरी हिंदू म्हणून मिळवली प्रसिद्धी; या गोष्टीमुळं आयुष्यभर एकटीच राहिली अभिनेत्री

आशा सचदेव

आशा सचदेव

बॉलिवूडची एक अभिनेत्री अशी होती जिला सुंदर आणि प्रतिभावान असूनही योग्य ती ओळख मिळाली नाही. ती मुस्लिम आईवडिलांच्या पोटी जन्माला आली होती पण नशिबाने तिला हिंदू बनवलं. एवढंच नाही तर अभिनेत्री आयुष्यभर एकटीच राहिली. काय होती तिच्या आयुष्याची गोष्ट जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 04 जुलै : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या आयुष्यातील किस्से वर्षानुवर्षे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होतात. बॉलिवूडच्या अशाच एका अभिनेत्रीची कायम चर्चा होत आली आहे. ही अभिनेत्री म्हणजे आशा सचदेव. 70-80 च्या दशकातील बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आशा सचदेवने आपल्या दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांना वेड लावलं होतं. तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या. पण सुंदर आणि प्रतिभावान असूनही तिला योग्य ती ओळख मिळाली नाही. ती मुस्लिम आईवडिलांच्या पोटी जन्माला आली होती पण नशिबाने तिला हिंदू बनवलं. एवढंच नाही तर अभिनेत्री आयुष्यभर एकटीच राहिली. काय होती तिच्या आयुष्याची गोष्ट जाणून घ्या. लहानपणी आशाचं नाव नफीसा सुलतान असं होतं. तिचा जन्म मुंबईतील एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. पण नंतर नशिबानं असं वळण घेतलं की, ती नफिसा सुलतानपासून आशा सचदेव बनली आणि त्याच नावाने बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाली. तिचे वडील आशिक हुसैन वारसी हे संगीताच्या जगाशी संबंधित होते, तर तिची आई अभिनेत्री होती. तिचं नाव रजिया असं होतं. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर नफीसा आईसोबत राहू लागली. त्यानंतर तिच्या आईनं मुंबईतील एका प्रसिद्ध वकिलाशी लग्न केलं आणि स्वतःचा धर्म बदलत रंजना सचदेव असं नामकरण केलं. याचमुळे नफीसा आशा सचदेव बनली.

News18लोकमत
News18लोकमत

आशाची आई रंजना यांनी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. आशालाही आईप्रमाणे अभिनेत्री व्हायचं होतं. तिने एफटीआयआय, पुणे येथून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलं होतं. ती पहिल्यांदा ‘डबल क्रॉस’ चित्रपटात दिसली होती. नंतर त्यांनी ‘बिंदिया और बंदूक’, ‘हाथी के दात’, ‘कश्मकश’, ‘एक नारी दो रूप’ आणि ‘हिफाजत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. साध्या भूमिकांऐवजी ग्लॅमरस भूमिकेत तिला प्रेक्षकांनी पसंती दिली होती, त्यामुळे ती अशाच भूमिका करत होती. तिला जी काही पात्रं मिळाली, ते ती करत राहिली. ‘ती फारच घमंडी होती…’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं तब्बल 30 वर्षांनी ममता कुलकर्णीबद्दल केला मोठा खुलासा आशा सचदेवने ‘मेहबूबा’ आणि ‘एक ही रास्ता’ या चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका साकारल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिला 1978 मध्ये ‘प्रियतमा’साठी फिल्मफेअर बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस अवॉर्ड मिळाला होता. ‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटात ती फक्त एका गाण्यात दिसली, ज्यामुळे ती प्रसिद्ध झाली. पण तरीही तिला हव्या त्या भूमिका मिळाल्या नाहीत. यानंतर तिने काही बी ग्रेड चित्रपटात काम केलं. त्यामुळे तिची इमेज खराब झाली आणि अनेक मोठे चित्रपट तिच्या हातून निसटले. त्यामुळे मोठे दिग्दर्शक तिला तिच्या चित्रपटात घेण्यास टाळाटाळ करू लागले. तिला छोट्या चित्रपटात काम करायला भाग पाडलं. तिला साईड रोल्समध्ये समाधान मानावे लागले, पण जेव्हाही ती पडद्यावर आली तेव्हा तिने प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळी छाप सोडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीच्या कोणत्याही अभिनेत्यासोबतच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या नाहीत. मात्र असे म्हटले जाते की, तिचे एका बिझनेसमनवर प्रेम होते, ज्याच्याशी ती लग्न करण्याचे स्वप्न पाहत होती, परंतु लग्नाच्या काही वेळापूर्वीच एका कार अपघातात या व्यावसायिकाचा मृत्यू झाला. 67 वर्षीय आशा सचदेव यांना पुन्हा कधीच लग्न करण्याची इच्छा झाली नाही. त्यामुळे ही अभिनेत्री आयुष्यभर कुमारीकाच राहिली. अभिनेता अर्शद वारसी हा आशा सचदेवचा सावत्र भाऊ आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात