मुंबई, 13 जानेवारी : संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आरडी बर्मन आणि आशा भोसले. आपल्या सुरेल आवाजानं केवळ हिंदीच नाही तर मराठी तसेच अनेक भाषात आशा ताईंनी आपली मोहोर उमटली. तर आरडी बर्नम म्हणजे पंचम दा यांनी त्यांच्या दर्जेदार गाण्यांनी नव्वदचा काळ गाजवला. आशा ताई आणि पंचम दा यांची जोडी आजही हिट आहे. दोघांनी एकत्र अनेक गाणी त्यातील काही गाणी अजरामर झाली. त्यावेळी पंचम दांचं संगीत आणि आशा ताईंचा आवाज हे एकमेकांसाठीच बनले आहेत असं वाटत होतं. दोघांची केमिस्ट्री तेव्हाही हिट होती आणि आजही तितकीच हिट आहे. त्यांची भन्नाट केमिस्ट्री नक्की कशी होती हे दाखवणारा एक व्हिडीओ पाहायला मिळतोय. आशा ताई आणि पंचम दा यांचं सुरेल नातं या व्हिडीओमधून पाहायला मिळतंय.
1972साली आलेल्या 'अपना देस' सिनेमातील 'दुनिया में लोगो को' हे गाणं तुफान गाजलं होतं. तरुणाईमध्ये हे गाणं विशेष प्रसिद्ध झालं होतं. अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री मुमताज यांच्यावर गाणं चित्रीत करण्यात आलं होतं. या गाण्याला आरडी बर्नम यांनी संगीत दिलं होतं. तर आशा ताईंनी गाणं गायलं होतं. त्यावेळी आशा ताईंचे आयटम साँग प्रसिद्ध होते. या गाण्याची खासियत म्हणजे आशा भोसले यांनी गाणं गायलं खरं पण त्यात आर. डींनी केलेल्या आवाजाच्या जादुनं हे गाणं विशेष पसंतीस उतरलं.
हेही वाचा - Life@25 Asha Bhosale : 16व्या वर्षी पळून लग्न; पन्नाशीत जुळले पंचम दांशी सुर, आशा भोसलेंची फिल्मी लव्ह लाईफ
आरडी ने फ़िल्म संगीत को कितना कुछ दिया, नई पहचान, नई बीट्स, जोश, उमंग… कुल मिलाकर वो इंटरटेनमेंट जिस पर लोग झूमे। लेकिन लोगों को झुमाने से पहले वो खुद झूमते थे- यही उनकी कामयाबी की सबसे बड़ी वजह भी थी #Raaggiri @ashabhosle जी के साथ बेमिसाल वीडियो @YRDeshmukh @hvgoenka @sumrag pic.twitter.com/lAEkl8P1VO
— Raaggiri रागगीरी (@Raaggiri) January 13, 2023
दुनिया में लोगो को या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ समोर आला आहे. ब्लॅक अँड व्हाइटच्या काळातील हा व्हिडीओ आहे. गाण्यात येणारे बीट्स आरडी बर्मन यांनी स्वत: तोंडाने काढले होते. हेच या गाण्याचं वेगळेपण होतं. या गाण्यानं लाखो प्रेक्षकांनी आपल्या तालावर नाचवलं. पण गाणं तयार होत असताना स्वत: आरडी बर्मनच बेभान होऊन नाचत होते. गाण्याच्या प्रत्येक लाईनवर आरडी थिरकताना दिसत आहेत. त्यांच्या तुलनेत आशा ताई मात्र फार लक्ष देऊन गाताना दिसतात. आरडी आणि आशा भोसले यांच्या यशामागचं खरं गमक इथे पाहायला मिळत आहे.
आशा भोसले आणि आरडी बर्मन यांची ओळख तिसरी मंजिल या सिनेमाच्या निमित्तानं झाली होती. त्यावेळी दोघांचीही पहिली लग्न मोडली होती. एकत्र काम करताना दोघांचे सुर जुळले. त्या काळात आशा ताईंनी आरडींसाठी अनेक गाणी गायली. दोघांच्या आवडी निवडी फार मिळत्या जुळत्या होत्या. दोघे खाण्याचे शौकिन होते. दोघांची म्युझिकल लव्ह स्टोरी इंडस्ट्रित चांगली गाजली. दोघांना 14 वर्ष एकमेकांबरोबर सुखानं संसार केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Song