मुंबई, 2 8ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) याचा सुपूत्र आर्यन खानला आज 25 दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) जामीन मंजूर (Aryan Khan, Munmun Dhamecha, Arbaaz Merchant granted bail) केला आहे. त्यामुळे आर्यनची दिवाळी तुरुंगात नाही, तर आपल्या घरीच साजरी होणार आहे. यामुळे शाहरूख खान आणि गौरी खाननेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे. यानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख आणि आर्यनला पाठिंबा दिला आहे. सोनू सूद (Sonu Sood), आर. माधवन ( R Madhavan), मलायका अरोरा**(Malaika Arora )**, अमृता अरोरा तसेच स्वरा भास्कर यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. अभिनेता सोनू सूदने जामीन मिळताच ट्वीट करत शाहरुख खान आणि आर्यनला पाठिंबा दिला आहे. सध्या सोनूचे हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात अभिनेता सोनू सूदने ट्वीट करत म्हटलं आहे की, “काळ जेव्हा निर्णय घेतो, तेव्हा साक्षीदारांची गरज नसते”, अशा आशयाचे ट्वीट सोनूने केले आहे. सोनूने केलेल्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
समय जब न्याय करता है,
— sonu sood (@SonuSood) October 28, 2021
तब गवाहों की जरूरत नहीं होती।
अभिनेता आर माधवन याने देखील ट्वीट करत देवाचे आभार मानत म्हटलं आहे की, एक वडील म्हणून मी आता समाधानी आहे. आता इतुन पुढे, सर्व चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी घडू दे, अशा अशायचे ट्वीट केले आहे.
Thank god . As a father I am So relieved .. … May all good and positive things happen.
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) October 28, 2021
बॉलिवू़ड अभिनेत्री मलायका अरोराने देखील तिच्या इन्स्टा स्टोरीला धन्यवाद देवा असं म्हणत आर्यन खानला पाठिंबा दिला आहे.
Aryan Khanला जामीन मिळताच बॉलिवूडमधून उमटल्या अशा प्रतिक्रिया
यासोबतच मलायकाची बहीण बॉलिवू़ड अभिनेत्री अमृता अरोराने देखील इन्स्टाला शाहरूख खानच्या फॅमेलीचा फोटो इन्स्टा स्टोरील शेअर करत फक्त प्रेम असं म्हटलं आहे.
Aryan Khanला जामीन मिळताच बॉलिवूडमधून उमटल्या अशा प्रतिक्रिया
आर्यनला जामीन मिळताच अभिनेत्री स्वरा भास्करने देखील मुंबई उच्च न्यायालयाच (Mumbai High Court) ट्वीट् रिट्वीट करत .. “FINALLY ! असं म्हणत हाता जोडल्याची इमोजी शेअर केली आहे.
FINALLY ! 👏🏽👏🏽👏🏽👏🏽 https://t.co/2zW4ldEqpW
— Swara Bhasker (@ReallySwara) October 28, 2021
या कलाकारांसोबत मिका सिंग अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनी आर्यन खानला जामीन मिळाताच सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. आर्यनला अखेर जामीन मंजूर तब्बल 25 दिवसांपासून तुरुंगात (Aryan Khan in Jail) असणाऱ्या आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने अखेर आज जामीन मंजूर केला आहे. आर्यनसोबतच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या दोघांनाही जामीन देण्यात आला आहे. देशाचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी, तसंच ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे या वकिलांनी आर्यन खानची बाजू मांडली.