मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Aryan Khan Bail: मुलगा तुरुंगातून सुटेपर्यंत आई गौरी खानची रडून झाली भयंकर अवस्था; मित्रांनी सांगितली परिस्थिती

Aryan Khan Bail: मुलगा तुरुंगातून सुटेपर्यंत आई गौरी खानची रडून झाली भयंकर अवस्था; मित्रांनी सांगितली परिस्थिती

शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने मुलाची (Aryan Khan arrest) अटक जिव्हारी लावून घेतली होती. 25 दिवसांनी आर्यन जामिनावर सुटला असला तरी आई गौरीने इतके दिवस खाणं-पिणं जवळपास सोडलं होतं, फक्त प्रार्थना करत एकटीच बसायची, असं तिच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.

पुढे वाचा ...

    मुंबई, 28 ऑक्टोबर: क्रूझ पार्टीमधल्या (Cruise Party) ड्रग्जप्रकरणी शाहरुख आणि गौरी खानचा मुलगा आर्यन याला अखेर आज (28 ऑक्टोबर) जामीन (Aryan Khan Bail) मिळाला आहे. त्यामुळे आर्यनची दिवाळी तुरुंगात नाही, तर आपल्या घरीच साजरी होणार आहे. यामुळे शाहरूख खान आणि गौरी खाननेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौरी खानने आर्यनला अटक केल्यापासून खाणं सोडलं (Gauri Khan stops Eating) होतं. यासोबतच सतत प्रार्थना करून आणि रडून तिची अवस्था अगदी वाईट झाली होती; मात्र अखेर आज त्यांना आर्यनच्या जामिनाची बातमी मिळाली आहे.

    आर्यनच्या अटकेपासून ढासळली गौरी खानची प्रकृती

    तीन ऑक्टोबरला आर्यनला ड्रग्जप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर शाहरुखने जरी हे प्रकरण संयमाने हाताळलं असलं, तरी गौरी खानचं मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक प्रकृती त्यानंतर बरीच खालावली (Gauri Khan mental health) आहे.

    “गौरीने खाणं जवळपास पूर्णपणे सोडलं आहे. ती आर्यनबद्दल किंवा या एकूण प्रकरणाबद्दल कोणाशीही बोलत नाही. ती अशीच राहिली, तर मानसिक आणि शारीरिक ताणामुळे तिला नर्व्हस ब्रेकडाउन (Gauri Khan Nervous breakdown) होऊ शकतो,” अशी माहिती तिच्या एका मित्राने बॉलिवूड हंगामाला दिली.

    शाहरुख आणि गौरीच्या फॅमिली फ्रेंडने (Gauri Khan Family friend) पुढे सांगितलं, “आर्यनच्या अटकेनंतर शाहरुखने गौरीच्या तुलनेत स्वतःला चांगलंच सांभाळलं आहे. गौरी मात्र आपल्या अपरिहार्यतेवर अगदीच नाराज आहे. तिने आपल्या सर्वच मित्र-मैत्रिणींना भेटणं बंद केलं आहे. तसंच, तिचा सगळा वेळ प्रार्थना करण्यात आणि रडण्यातच जातो आहे.” “आर्यनला लवकर जामीन (Aryan Khan bail) मिळाला नाही, तर तिची प्रकृती अधिकच ढासळेल,” असंही एका सूत्राने म्हटलं होतं.

    आर्यनला अखेर जामीन मंजूर

    तब्बल 26 दिवसांपासून तुरुंगात (Aryan Khan in Jail) असणाऱ्या आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने अखेर आज जामीन मंजूर केला आहे. आर्यनसोबतच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांनाही जामीन देण्यात आला आहे. देशाचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी, तसंच ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे या वकिलांनी आर्यन खानची बाजू मांडली.

    एनसीबीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला.

    जामीन मिळाला असला, तरी आजची रात्र तुरुंगात

    दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार जामीन मंजूर झाला असला तरी त्याचं निकालपत्र आणि जामिनाच्या अटी यावर शुक्रवारी (29 ऑक्टोबर) अंतिम निर्णय होईल. त्यामुळे आजची रात्रही आर्यनला तुरुंगातच काढावी लागणार आहे.

    First published:

    Tags: Drugs, Shahrukh khan