नवी दिल्ली, 06 डिसेंबर: इंडियन आयडॉल सीझन 12 (Indian Idol season 12) यातील स्पर्धकांच्या खास शैलीमुळे विशेष लक्षात राहणारा सीझन आहे. यातील स्पर्धकांच्या गाण्याशिवायही इतर गोष्टींमुळे हा सीझन खास ठरला. या स्पर्धेतील अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन (Arunita Kanjilal and Pawandeep Rajan) हे दोघे चर्चेत आले होते. दोघांचे नावही एकमेकांसह जोडले गेले. स्पर्धा संपल्यानंतरही दोघे विविध प्रोजेक्टसाठी एकत्र दिसले होते. या हिट जोडीचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. दरम्यान नुकतीच अशी माहिती समोर आली आहे की, अरुणिताने पवनदीपसह एका प्रोजेक्टमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. यामुळे पवनदीप-अरुणिताच्या चाहत्यांची निराशा झाली आहे.
अरुणिताच्या वडिलांची होती ही मागणी
राज सुरानी या गाण्याचे दिग्दर्शन करणार होते. या दोघांसाठी 'मंजूर दिल' हे गाणेही त्यांनीच दिग्दर्शित केले होते. पवनदीप आणि अरुणिता यांच्यात सर्व काही ठीक चालत नसल्याचेही बोलले जात आहे. ई-टाइम्सच्या अहवालानुसार, इंडियन आयडॉलमध्ये दाखवण्यात आलेल्या त्यांच्या लव्ह ट्रॅकबाबत अरुणिताचे आई-वडील खूश नव्हते. जेव्हा राज सुरानी यांनी दोघांच्या तीन म्युझिक व्हिडिओंचा करार केला, तेव्हाही अरुणिताच्या वडिलांनी असे स्पष्ट केले होते की या व्हिडिओमध्ये कोणतेही इंटिमेट सीन नसतील.
हे वाचा-'मित्र आपल्या मागून आपलीच एवढी इज्जत नाही काढत...', स्नेहाने साधला जयवर निशाणा
हे आहे कारण
अशी माहिती मिळते आहे की तिच्यासह एक माणूस सेटवर देखील येत असे. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की वडिलांच्या हस्तक्षेपामुळे तिने दुसरा म्युझिक व्हिडीओ सोडला आहे. राज सुरानी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, अरुणिताला म्युझिक व्हिडीओमध्ये यायचे नव्हते असे काही नाही. जर तिला परफॉर्मच करायचं नसतं तर तिने परदेशात शो का केले असते. राज सुरानी म्हणाले, 'मला वाटते की त्यांनी म्युझिक व्हिडीओमध्ये काम करायचे नाही हा निर्णय कुटुंबाचा होता. मी खरोखर निराश झालो आहे.'
हे वाचा-विकी-कतरिनाच्या लग्नासाठी सजणार शाही मांडव; रथावर होणार एण्ट्री, वाचा डिटेल्स
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अरुणिताच्या आईने देखील अशीच प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या मते, तिला अभिनयात कोणताही रस नाही, तिला केवळ गाण्यावर लक्ष्य केंद्रित करायचे आहे. कंपनी तिच्याकडून ज्याप्रकारचा अभिनय करू पाहत होती त्यामुळे तिच्यावरील तणाव वाढत होता. त्यामुळे तिने असा निर्णय घेतला असल्याचे सुरानी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian idol