Home /News /entertainment /

‘अनोळखी कॉलरपासून सावध राहा’; मराठी अभिनेत्याला केलं जातंय ब्लॅकमेल

‘अनोळखी कॉलरपासून सावध राहा’; मराठी अभिनेत्याला केलं जातंय ब्लॅकमेल

मराठी अभिनेता अडकला हॅकरच्या जाळ्यात; फेसबुकद्वारे केलं जातंय ब्लॅकमेल

    मुंबई 11 एप्रिल: सोशल मीडिया (Social media) हे सध्याचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. या माध्यमामुळं अनेक सर्वसामान्य लोकांना रातोरात प्रसिद्धी मिळते. अनेकांना चांगल्या पगाच्या नोकऱ्या मिळतात. व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत मिळते. शिवाय जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीसोबत आपण काही क्षणात संवाद करु शकतो. पण हे सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवारच आहे. (Social media blackmail) जितके याचे फायदे आहेत तितकेच तोटे देखील आहेत. आणि सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमची खासगी माहिती हॅकर्सद्वारे लीक केली जाऊ शकते. अन् असाच काहीसा प्रकार प्रसिद्ध मराठी अभिनेता, दिग्दर्शक अरोह वेलणकर (Aroh Welankar) याच्याबाबतीत घडला आहे. त्याला फेसबुकद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Facebook blackmail scams) याबाबत त्यानं पोलीस तक्रार केली आहे. एका अज्ञात हॅकरनं आरोहचं फेसबुक अकाउंट हॅक केलं होतं. शिवाय त्यानं आरोहचा एक मॉर्फ व्हिडीओ तयार करुन त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न देखील केला. त्यानं फोन करुन आरोहला धमकी दिली. फेसबुकवरुनच त्याला अभिनेत्याचा नंबर मिळाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान आरोहनं याबाबत पुणे पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांचा सायबर गुन्हे विभाग या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. अवश्य पाहा - ‘तुला अंतर्वस्त्र पाठवू का?’; अनुषा दांडेकरनं ट्रोलर्सची बोलती केली बंद हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आरोहनं आपल्या चाहत्यांना काही खास सल्ले दिले आहेत. तो म्हणाला, “कृपया अज्ञात कॉल घेऊ नका आणि आपण कोणाशी गप्पा मारत आहात याची काळजी घ्या. एखादा हॅकर तुमच्या माहितीचा गैरवापर देखील करु शकतो. मॉर्फ व्हिडीओद्वारे तुम्हाला ब्लॅकमेलही केलं जाऊ शकतं. अन् अशा प्रकरणात अडकल्यास सर्वप्रथम पोलिसांनी संपर्क साधा अन्यथा तुम्ही आणखी मोठ्या संकटात अडकू शकता.” आरोह वेलणकर हा मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यानं रेगे आणि घंटा या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत त्यानं साकारलेल्या डॉ. सौरभ या भूमिकेमुळं तो खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आला होता. येत्या काळात तो ‘वीर’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Actor, Crime, Cyber crime, Facebook

    पुढील बातम्या