मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

‘तुला अंतर्वस्त्र पाठवू का?’; अनुषा दांडेकरनं ट्रोलर्सची बोलती केली बंद

‘तुला अंतर्वस्त्र पाठवू का?’; अनुषा दांडेकरनं ट्रोलर्सची बोलती केली बंद

अनुषाचा बोल्ड फोटो पाहून महिला संतापली; अभिनेत्रीनं देखील दिलं जोरदार प्रत्युत्तर

अनुषाचा बोल्ड फोटो पाहून महिला संतापली; अभिनेत्रीनं देखील दिलं जोरदार प्रत्युत्तर

अनुषाचा बोल्ड फोटो पाहून महिला संतापली; अभिनेत्रीनं देखील दिलं जोरदार प्रत्युत्तर

    मुंबई 10 एप्रिल: मॉडेल,गायिका,अभिनेत्री आणि व्हिजे अनुषा दांडेकर (Anusha Dandekar)नुकतीच करण कुंद्रासोबत (Karan Kundra)झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. या ब्रेकअपचा खुलासा करताना तिने करणवर फसवणुकीचे आरोप लावले होते. अनुषा सोशल मिडीयावर बोल्ड फोटोज शेअर करीत असते. नुकताच तिने बिनधास्त मूडमधला फोटो(Braless Photo)सोशल मिडीयावर (Social Media)शेअर केला. मात्र त्यामुळं  तिला ट्रोलर्सने मोठ्या प्रमाणावर ट्रोल (Troll)केले. यावेळी एका युझरने तिला तुला अंतर्वस्त्र पाठवू का? अशा आशयाची कमेंट केली. ही कमेंट वाचून अनुषाने त्या युझरला चांगलेच उपदेशाचे डोस पाजले. अनुषा दांडेकरनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत जर तुम्ही मला लॉक करु इच्छित असाल तर या वस्तुंसह मला खोलीत बंद करा. कारण या वस्तु मला फार आवडतात, असं म्हटलं होतं. या फोटोत अनुषाने केवळ एक जॅकेट परिधान केल्याचं दिसत आहे. तिचा हा अंदाज काही नेटकऱ्यांना आवडला नाही. यावेळी एका महिला युझरनं कमेंट करताना लिहीलं की “माझ्याकडे एक्स्ट्रा ब्रा आहे. तू पत्ता सांग, मी तुला ती पाठवून देते.” या कमेंटवर अनुषाने मजेदार रिप्लाय दिला. ती म्हणाली की, “तुम्ही ती तुमच्याकडेच ठेवा, मी तिच्याविनाच आनंदी आहे. धन्यवाद.” अनुषानं दिलेल्या या उत्तरामुळे त्या महिला नेटकरीचं तोंडच बंद झालं. अनुषा निवेदिका असल्याने हजरजबाबी आहे त्यामुळे तिने प्रश्नाला जसंच्या तसं उत्तर दिलं. अवश्य पाहा - अब्जाधीश व्यवसायिकाला अभिनेत्रीचा नकार; मालिकेत काम करण्यासाठी मोडलं लग्न अनुषाच्या याच पोस्टवर दुसऱ्या एका युझरने लिहीलं की सध्या सगळीकडेउष्णतावाढली आहे,त्यात तु अशी. दुसऱ्या एका युझरने कमेंट केली की तुम्ही काही परिधान केले होते का जे दिसतय ते स्पष्ट आहे? अनुषा सध्या अभिनेता आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक जेसन शाह (Jessan Shah)याला डेट करतीय. नुकतेच जेसनने अनुषासोबत असलेले रिलेशन मान्य केले असून,तो म्हणाला की मी आणि अनुषा काही दिवसांपासून एकमेकांना डेट करीत आहोत. पहिल्या भेटीतच ती मला आवडली होती. मी तिच्यावर प्रेम करतो. परंतु,अजून आम्ही लग्नाविषयी निर्णय घेतलेला नाही. सध्या आम्ही हे क्षणएंजॉय करतोय. अनुषासोबतचं आयुष्य मला खूप सुंदर वाटतं,असं जेसन शाहनं म्हटलं आहे.
    First published:

    Tags: Bold photoshoot, Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या