मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Arjun Kapoor: 'आई तुझ्याशिवाय मी...' आईसाठी भावुक झाला अर्जुन; पोस्ट वाचून तुमचेही डोळे पाणावतील

Arjun Kapoor: 'आई तुझ्याशिवाय मी...' आईसाठी भावुक झाला अर्जुन; पोस्ट वाचून तुमचेही डोळे पाणावतील

अर्जुन कपूरची आईसाठी खास पोस्ट

अर्जुन कपूरची आईसाठी खास पोस्ट

आज अर्जुनच्या आईने या जगातून एक्झिट घेऊन 11 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त अर्जुन आणि त्याची बहीण अंशुला यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट वाचून चाहतेही भावुक झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 मार्च : अर्जुन कपूरने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या आईनं या जगातून एक्झिट घेतली.  त्याच्या चाहत्यांकडून त्याला याबद्दल नेहमीच सहानुभूती मिळाली आहे. आज अर्जुनच्या आईने या जगातून एक्झिट घेऊन 11 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त अर्जुन आणि त्याची बहीण अंशुला यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट वाचून चाहतेही भावुक झाले आहेत.

अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर यांनी त्यांच्या 11 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची आई मोना शौरी कपूर यांची आठवण काढली आहे. अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याची आई मोना शौरी कपूरसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. त्यात लिहिताना अर्जुनने म्हटले आहे कि, 'कोण काय बोलले याची त्याने कधीच पर्वा केली नाही कारण त्याच्यासमोर नेहमी त्याची आई असते जिने त्याला आपण कोण आणि काय आहोत याची जाणीव करून दिली.'

'शिवीगाळ केली, गाडी फोडली' अब्दू रोजिकच्या गंभीर आरोपांवर एमसी स्टॅनचं प्रत्युत्तर; म्हणाला 'हा मूर्खपणा...'

त्याने पुढे म्हटलं आहे कि, 'तू गेल्यापासून 11 वर्षे उलटून गेली आहेत. तेव्हापासून तू मला सर्व वाईट गोष्टींपासून संरक्षण देणारी ढाल बनली आहेस परंतु आजच्या क्रूर जगात मी सर्व द्वेषाचा सामना करण्याचा प्रयत्न करत असताना तू येथे असावे अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक गोष्टीचा हसतमुखाने सामना करायला शिकवले. कदाचित मला एक चांगली व्यक्ती, अधिक आनंदी व्यक्ती बनवले आहेस.'

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुन कपूरने पुढे लिहिले की, 'आई तुझ्याशिवाय मी अजूनही हरवलेले मुल आहे... मी तुला सर्वत्र शोधतो कारण मी या फोटोप्रमाणे हरवलेला आहे, पण मला नेहमी विश्वास आहे की तू या फोटोप्रमाणे हसत आहेस आणि माझी काळजी घेत आहेस... आपण लवकरच भेटू.' असं म्हणत अर्जुन कपूरने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

अर्जुनच्या या पोस्टवर वरूण धवन, समंथा रुथ प्रभू, रकुल प्रीत सिंग, संजय कपूर आणि इतर अनेकांनी कमेंट्स करत त्याला धीर दिला आहे. अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये आईचा फोटोही शेअर केला आणि लिहिले 'आई मी काही नाही तर तुझी सावली आहे. आतून आणि बाहेरून. तुझी आठवण येते आई परत ये ना….'

बहीण अंशुला कपूरनेही मोना शौरीची आठवण काढली आणि लिहिले, '11 वर्षे झाली. जेव्हापासून मी तुला अनुभवले, जेव्हापासून मी तुझे हसणे पाहिले, तेव्हापासून मी तुझा हात धरला. दरवर्षी जेव्हा हा दिवस येतो तेव्हा आम्ही तुमच्याशिवाय आणखी एक वर्ष इथे घालवतो. माझ्या हृदयातील वेदना वाढल्यासारखे वाटते. मला तुझी आठवण येते का? कारण मला तुझी रोज आठवण येते. तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि यापुढेही करत राहीन. बहिण जान्हवी कपूर, खुशी कपूर, रिया कपूर आणि इतर बर्‍याच जणांनी अंशुलाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आणि रेड हार्ट इमोजीचा वर्षाव केला. मोना शौरी कपूर यांचे 25 मार्च 2012 रोजी कर्करोगामुळे निधन झाले. त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते.

First published:
top videos

    Tags: Arjun kapoor, Bollywood actor, Bollywood News, Entertainment