मुंबई, 2 मे : अभिनेता अर्जुन कपूर मागच्या काही दिवसांपासून त्याचा आगामी सिनेमा ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून यामध्ये अर्जुन कपूरचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. या टीझर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर आज ( 2 मे ) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. याची माहिती अर्जुन कपूरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्टर शेअर करत दिली.
‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या सिनेमाची कथा आहे भारतातील अशा कुख्यात गुंडाची जो स्वतःला भारताचा ओसामा बिन लादेन समजतो. या स्वयंघोषीत भारताच्या ओसामाला पाचजण कसे पकडतात. याच चित्रण या सिनेमात करण्यात आलं आलं आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये 2007 ते 2013 पर्यंत सात शहरांमध्ये झालेल्या 52 बॉम्बस्फोटांचा दाखला देण्यात आला आहे. या हल्ल्यात सुमारे ८१० लोख जखमी आणि ४१३ लोकांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येते.
या सर्व हल्ल्यांच्या मागे जी व्यक्ती असते ती सातत्याने एकच गोष्ट सांगताना दिसते ती म्हणजे, ‘शरीर मरतं पण आत्मा मरत नाही. मी लोकांना मारत नाही. फक्त त्यांचा आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात पाठवतो, असं मी नाही गीतेत श्रीकृष्णाने म्हटलं आहे.’ यानंतर टीझरमध्ये चार नवीन व्यक्तिरेखा समोर येतात. हे चारही अर्जुन कपूरसोबत दहशतवादी ओसामाला पकडण्याच्या तयारीला लागतात. सिनेमात अर्जुन पुन्हा एकदा अॅक्शन सीन करताना दिसत आहे. कंगना रनौत डॉक्टरांच्या निशाण्यावर, ‘मेंटल है क्या’च्या अडचणीत वाढ सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’चं दिग्दर्शन राज कुमार गुप्तानं केलं असून यापूर्वी ‘रेड’ सिनेमामुळे राज कुमार गुप्ता चर्चेत आला होता. अर्जुनशिवाय या सिनेमात अमृता पुरी आणि राजेश शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ सिनेमा येत्या 24 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. …और प्यार हो गया ! ‘या’ व्यक्तीमुळे सुरू झाली निक-प्रियांकाची लव्हस्टोरी मागच्या काही दिवसांपासून अभिनेत्री मलायका अरोराशी असलेल्या अफेअरमुळे अर्जुन कपूर खूप चर्चेत आहे. एप्रिलच्या 19 तारीखला हे दोघंही लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र या सर्व अफवा असल्याचं सांगत या दोघांनीही हे वृत्त फेटाळलं होतं. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा लवकरच अर्जुन आणि मलायका गोव्यात ख्रिश्चन पद्धतीनं डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.