Home /News /entertainment /

Arjun Kapoor Birthday: चित्रपटांत फ्लॉप झाल्यानंतरही अर्जुनची दबंग कमाई! आकडा वाचून भोवळ येईल

Arjun Kapoor Birthday: चित्रपटांत फ्लॉप झाल्यानंतरही अर्जुनची दबंग कमाई! आकडा वाचून भोवळ येईल

इश्कजादे फेम अर्जुन कपूर (Arjun Kapoor income) वयाच्या चाळीशीच्या आसपास जात असताना सुद्धा कमावतो एवढे चिक्कार पैसे की अनेकांना वाचून नक्कीच चक्कर येईल

  मुंबई 25 जून: बॉलिवूडचा एक मोठं नाव असलेला अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आज त्याचा सदतिसावा वाढदिवस साजरा करत आहे. अर्जुन या अन त्या कारणाने चर्चेत येत असतो. या अभिनेत्याच्या (Arjun Kapoor Career) आयुष्यात अजून घवघवीत आणि मनासारखं यश आलेलं नसलं तरी त्याच्याबद्दल बरीच चर्चा होताना दिसते. सध्या म्हणावं तसं यश मिळवून देणारा चित्रपट त्याच्या आयुष्यात आला नसला तरी हा अभिनेता किती पैसे कमावतो हे माहित आहे का? अर्जुनने बॉलिवूडमध्ये एका सुपरहिट चित्रपटासह एंट्री केली. 2012 साली आलेल्या ‘इश्कजादे’ (Ishaqzaade) चित्रपटातून तो झळकला आणि नुसताच झळकला नाही तर त्याला डेब्यूमध्ये दमदार यश मिळालं. त्यानंतर लगेचच आलेल्या (2 States) 2 स्टेट्स, कि अँड का (Ki & Ka) चित्रपटामुळे अर्जुन कपूर मोठ्या स्टारच्या लिस्टमध्ये गणला जाऊ लागला. पण अचानक त्याच्या ढासळत्या पर्फोसर्मन्सनं आणि सुमार दर्जाच्या संहितांमुळे त्याचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्याच्याच होम प्रोडक्शन असणाऱ्या ‘तेवर’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर काहीच यश मिळालं नाही. हा सिनेमा एवढा सपशेल आपटला की त्याच्या टॅलेंटवर शंका घेतली जाऊ लागली. याजोगे अर्जुनचं करिअर आता डब्यात जाणार अशी सुद्धा शंका येऊ लागली. यांनतर ब्रेक घेत घेत अर्जुन काही फिल्म्समध्ये झळकला पण त्याचा आधीच चार्म काही त्याला परत अनंत आलेला नाही. असं असूनही हा अभिनेता चिक्कार पैसे कमावताना दिसतो. अर्जुनाची नेटवर्थ ही जवळपास 89 करोडच्या आसपास आहे असं सांगितलं जातं. तर अर्जुन प्रत्येक फिल्मसाठी साधारण 7 कोटी रुपये आकारतो अशी माहिती सुद्धा समोर येत आहे. तो एका महिन्याला एका कोटीच्या आसपास पैसे कमावतो असं सुद्धा सांगितलं जातं.
  View this post on Instagram

  A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

  अर्जुन मागच्या काळात त्याच्या ओव्हरवेट शरीरासाठी ट्रोल झाला होता. त्याचा अभिनय फारसा जादू दाखवत नाही आणि बॉडी वरून सुद्धा त्याला अनेकदा टोमणे ऐकावे लागतात. अर्जुन त्याच्या डेटिंग लाईफमुळे देखील कायम चर्चेत राहिला आहे. हे ही वाचा- Shibani Dandekar: अभिनेत्री शिबानी दांडेकरचा मराठमोळा अंदाज! एका शब्दानं जिंकलं पापाराझीचं मन
   अर्जुन आणि अभिनेत्री नृत्यांगना मलायका अरोरा यांचं अफेअर ठाऊक असेलचं. त्यांनी लवकर लग्न करावं असा सल्ला चाहत्यांकडून दिला जात आहे. अर्जुन नुकताच मलायका सोबत वाढदिवसासाठी पॅरिसला जाताना दिसला होता.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Arjun kapoor, Birthday celebration

  पुढील बातम्या