Home /News /entertainment /

Shibani Dandekar: अभिनेत्री शिबानी दांडेकरचा मराठमोळा अंदाज! एका शब्दानं जिंकलं पापाराझीचं मन

Shibani Dandekar: अभिनेत्री शिबानी दांडेकरचा मराठमोळा अंदाज! एका शब्दानं जिंकलं पापाराझीचं मन

अभिनेत्री, गायिका शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) कायमच तिच्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. तिच्या मराठमोळ्या अंदाजाने तिने तिच्या चाहत्यांना खुश करून टाकलं आहे.

  मुंबई 25 जून: बॉलिवूडच्या कलाकारांचं आणि पाप्पारझीच वेगळंच नातं आहे. बॉलिवूडचे कलाकार जिथे जातात त्यांच्या मागे फोटो काढायला फोटोग्राफर दाखल होतात. कधी कलाकार प्रेमाने विचारपूस करतात चिडतात तर कधी गप्पा मारतात. पण आज फरहान अख्तरची (Farhan Akhtar wife) बायको शिबानी दांडेकरने (Shibani Dandekar) जे केलं ते पाहून पाप्पाराझी पण खुश झाली आहे. ऑस्ट्रेलियात वाढलेली आणि मराठी कुटुंबात जन्माला आलेली शिबानी एक अभिनेत्री- गायिका आहे हे तर सर्वाना माहित आहे. अस्खलित इंग्रजी बोलणारी ही अभिनेत्री, गायिका मराठीच्या बाबतीत अजिबात मागे पुढे होत नाही. शिबानी अगदी (Shibani Dandekar Marathi) व्यवस्थित मराठी बोलते आणि तिला आपल्या भाषेचा अभिमान सुद्धा आहे. या मराठमोळ्या मुलीचा सध्या एक विडिओ viral होताना दिसत आहे. शिबानी आपल्या नवऱ्यासमवेत आणि बहिणीसह जेवायला गेली असता तिला साहजिकच पाप्पाराझीनं घेरलं. फोटोग्राफर सुद्धा तिच्याशी मराठीत संवाद साधताना दिसत होते. एका फोटोग्राफरने फरहान शिबानी आणि तिच्या बहिणीचा एकत्र फोटो काढायला तिला सुद्धा बोलवा असं शिबानीला सांगितल्यावर ती ‘कशाला’ असं मराठीत बोलली आणि फोटोग्राफरशी अगदी उत्तम मराठीत संवाद साधू लागली. शिबानीचा हा मातृभाषेतील गोड संवाद कॅमेराने कॅप्चर केला. खरंतर मातृभाषा बोलण्याबद्दल एवढा गवगवा का होतो असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण इंग्रजी वातावरणात राहूनही शिबानी तिच्या संस्कृतीशी आणि भाषेशी एकनिष्ठ आहे याची प्रचिती या व्हिडिओमधून होते.
  शिबानीने याआधी सुद्धा कपिल शर्मा शोमध्ये कपिलसोबत मराठीमध्ये संवाद साधत त्याची बोलती बंद (Shibani Dandekar Kapil Sharma show marathi) केली होती. हे ही वाचा-  तिला हिंदी न येण्यावरून कपिल तिची मस्करी करत होता त्यावर शिबानीचं कडक उत्तर ऐकून बिचाऱ्या कपिलला घामच फुटला. “मला मराठी येतं आपण मराठीत बोलूया. तू मुंबईत एवढी वर्ष आहेस तुला अजून मराठी येत नाही” असा प्रश्न विचारात तिने कपिलची शाळा सुद्धा घेतली. आज अशाच काहीशा अंदाजात ती पाहायला मिळाली आणि तिने फोटोग्राफरसोबत सनावड साधला. शिबानीने काही काळापूर्वी फरहान अख्तर या बॉलिवूड अभिनेत्याशी लग्न केलं. शिबानी बऱ्याच काळापासून त्याला डेट करत होती. हे कपल अनेकदा एकत्र असायचं आणि त्यांचे फोटोसुद्धा दोघे शेअर करत असल्याचे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Bollywood actress, Bollywood News, Farhan akhtar

  पुढील बातम्या