जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Arjun Kapoor : वडिलांनी दुसरं लग्न केलं, पहिल्या सिनेमाआधी आई गेली; अर्जुन कपूरने आयुष्यात सोसलंय खूप दुःख

Arjun Kapoor : वडिलांनी दुसरं लग्न केलं, पहिल्या सिनेमाआधी आई गेली; अर्जुन कपूरने आयुष्यात सोसलंय खूप दुःख

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर

अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर यांनी पहिली पत्नी मोना सुरीला सोडून बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीसोबत दुसरं लग्न केलं होतं. बोनी कपूर यांनी श्रीदेवी सोबत लग्न केल्यांनतर मुलगा म्हणून अर्जुनला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला पाहूयात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 जून : अर्जुन कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. अर्जुनने बॉलिवूडमध्ये प्रवेश करून एक दशक पूर्ण केले आहे. त्याने परिणीती चोप्रासोबत इशकजादे हा पहिला हिट चित्रपट देऊन पतो लोकप्रिय झाला. यानंतर त्याने अनेक चित्रपट केले पण तरीही तो बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. अर्जुन कपूरने त्याच्या प्रोफेशनल लाइफपासून वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक गोष्टींचा सामना केला आहे. त्यांचे बालपण खूप तणावात गेले होते. अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर यांनी पहिली पत्नी मोना सुरीला सोडून बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीसोबत दुसरं लग्न केलं होतं. बोनी कपूर यांनी श्रीदेवी सोबत लग्न केल्यांनतर मुलगा म्हणून अर्जुनला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला पाहूयात. बोनी कपूर यांनी 1983 मध्ये मोना सुरीशी लग्न केले आणि 1996 मध्ये घटस्फोट घेतला.  या लग्नातून त्यांना मुलगा अर्जुन कपूर आणि मुलगी अंशुला कपूर ही अपत्ये झाली. त्यानंतर बोनी कपूर यांनी 1996 मध्ये बॉलिवूडची लेडी सुपरस्टार श्रीदेवीशी लग्न केले. या लग्नातून जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. श्रीदेवी आता आपल्यात नाहीत, 2018 मध्ये तिचे निधन झाले. तसेच अर्जुन कपूरची आई मोना सुरीनेही २०१२ साली या जगाचा कायमचा निरोप घेतला होता.

News18लोकमत
News18लोकमत

अर्जुनने एकदा वडील बोनीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल आणि सावत्र आई श्रीदेवीसोबतच्या त्याच्या बाँडिंगबद्दल बरेच काही सांगितले होते. बॉलीवूड बबलशी बोलताना त्याने सांगितले होते की, ‘जेव्हा त्याच्या वडिलांनी  दुसरे लग्न केले तेव्हा त्याचे शाळेतील मित्र त्याला खूप टोमणे मारायचे. तेव्हा तो खूप तणावाखाली जगला.’ धर्मेंद्रची पहिली पत्नी अन् हेमा मालिनीची लग्नाआधी अशी झालेली पहिली भेट; अभिनेत्री म्हणाली ‘मी तिचा आदर..’ रिपोर्टनुसार, अर्जुन कपूरने सांगितले होते की, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर तो त्याच्या आयुष्यात वैयक्तिक दुःख, आघात आणि अशांततेतून गेला होता. जेव्हा तो मोठा होत होता तेव्हा त्याला त्याच्या पालकांच्या भांडणाला आणि दुराव्याला सामोरे जावे लागले. त्यावेळी त्याच्यासाठी याला तोंड देणं खूप कठीण गेलं कारण त्यांचे वडील एक उच्च प्रोफाइल व्यक्ती होते आणि त्यांनी निवडलेली स्त्री ही भारतातील सर्वात मोठी सुपरस्टार होती.

जाहिरात

याबद्दल अधिक बोलताना अर्जुन म्हणाला होता, ‘तेव्हा शाळेतल्या जिवलग मित्रांनी मला विचारलं की, नवीन आई आली तुला, कसं वाटतं? तेव्हा त्यांना सामोरं जाणं हे सोपं नव्हतं.  हे वास्तव आहे. मी त्याच्याशी लढलो आहे. ‘अर्जुनच्या या खुलाशानंतर त्याचे वडील बोनी यांनीही एका मुलाखतीत सांगितले की, त्यांची दोन्ही मुले अंशुला आणि अर्जुन कपूर यांचा त्यांना खूप अभिमान आहे कारण त्यांनी श्रीदेवीला जगाच्या दृष्टिकोनातून कधीच पाहिले नाही. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अर्जुनने खुशी आणि जान्हवीची मोठ्या भावाप्रमाणे ज्या प्रकारे काळजी घेतली ते सर्वांसाठीच आश्चर्यकारक होते, तर आमच्यासाठी ते अगदी सामान्य होते. असा खुलासा त्याने केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात