मुंबई, 25 जून : हेमा मालिनी यांचे धर्मेंद्रसोबतच्या लग्नाची नेहमीच चर्चा होते. हे लग्न सामान्य नव्हतं. हेमा मालिनीसोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांना घटस्फोट दिला नव्हता. धर्मेंद्र यांनी चार मुलं असताना हेमाशी लग्नगाठ बांधली. धर्मेंद्रची पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी देखील आपला नवरा आणि हेमाचं नातं मेनी केलं होतं. पण असं असताना हेमा तिची सवत प्रकाश कौरला कधीच भेटली नाही. पण ही अभिनेत्री तिचा खूप आदर करते. या दोघींचं नातं नेमकं कसं आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. आता हेमा मालिनी यांनी त्यांच्या पुस्तकात याविषयी खुलासा केला होता. 74 वर्षीय हेमा मालिनी यांनी त्यांचं चरित्र ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’मध्ये म्हटले आहे की, ती धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना कधीही भेटली नाही, परंतु त्यांचा खूप आदर करते. त्यांनी पुस्तकात लिहिले आहे की, ‘मी प्रकाश कौरबद्दल कधीच काही बोलले नाही, पण मी त्यांचा खूप आदर करते. माझ्या मुलीही धरमजींच्या कुटुंबाचा आदर करतात.’
राम कमल मुखर्जी यांनी लिहिलेल्या या पुस्तकात असा उल्लेख केलेला आहे की, ‘हेमा आणि प्रकाश यांची एका सामाजिक कार्यक्रमात भेट झाली होती. हेमाने धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांची ‘अनेकदा’ भेट झाल्याचे त्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. लग्नानंतर हेमाने धर्मेंद्रच्या पहिल्या कुटुंबाशी अंतर राखणेच पसंत केले. 25 महिन्यांत 3 चित्रपट रिलीज; तिन्हीही ठरले फ्लॉप; ‘त्या’ एका फिल्मवर टिकलंय सुपरस्टारचं भवितव्य याविषयी त्यांनी लिहिलं होतं की, “मला कोणाला त्रास द्यायचा नव्हता. धरमजींनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी जे काही केले त्यात मी आनंदी आहे. कोणत्याही वडिलांप्रमाणेच त्यांनी वडिलांची भूमिका साकारली. मला वाटते की मी त्यात आनंदी आहे,” अशा भावना तिने व्यक्त केल्या होत्या. त्या पुढे म्हणाल्या होत्या की, ‘‘आज मी एक काम करणारी महिला आहे. मी माझे जीवन कला आणि संस्कृतीसाठी समर्पित केल्यामुळे मी माझा सन्मान राखू शकले आहे. मी प्रकाशबद्दल कधीच बोलले नसले तरी मला त्यांचा खूप आदर आहे. माझ्या मुलीसुद्धा धरमजींच्या कुटुंबाचा आदर करतात. जगाला माझ्या जीवनाबद्दल तपशीलवार जाणून घ्यायचे आहे, परंतु ते इतरांना कळू शकत नाही. हे माझं व्यक्तिगत आयुष्य आहे.’’ लग्नानंतर हेमा प्रकाशला कधीही भेटली नसली तरी, तिची मुलगी ईशा देओल एकदाच प्रकाशला धर्मेंद्रच्या घरी भेटली होती. चरित्राच्या दुसर्या भागात, ईशाने नमूद केले आहे की धर्मेंद्रचा भाऊ, अभय देओलचे वडील अजित यांची तब्येत खराब असताना तिने एकदा प्रकाश आणि धर्मेंद्र यांच्या घरी भेट दिली आणि तेव्हाच ती प्रकाशला भेटली होती.