जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Navratri 2021: पहिल्या दिवशी शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरने धारण केले अंबाबाईचं रुप

Navratri 2021: पहिल्या दिवशी शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरने धारण केले अंबाबाईचं रुप

Navratri 2021: पहिल्या दिवशी शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरने धारण केले अंबाबाईचं रुप

Navratri 2021: आज पासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र भक्तिमय आणि उत्साही वातावरण आहे. अशा या चैतन्यमय वातावरणात प्रत्येकवर्षी काही अभिनेत्री हटके फोटोशूट करत असतात. अपूर्वा नेमळेकर या अभिनेत्रीने देखील एक सुंदर फोटोशूट केले आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 ऑक्टोबर : आज पासून शारदीय नवरात्रौत्सवाला (navratri 2021) सुरुवात झाली आहे. सर्वत्र भक्तिमय आणि उत्साही वातावरण आहे. अशा या चैतन्यमय वातावरणात प्रत्येकवर्षी काही अभिनेत्री हटके फोटोशूट करत असतात. यंदाही एका प्रसिद्ध अभिनेत्रीने देवीचे रुप धारण (apurva nemlekar in goddess ambabai attire) करुन प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. रात्रीत खेळ चाले शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचं रूप घेऊन फोटोशूट केले आहे. फोटोत अपूर्वाने मळवट भरला आहे. ती अंबाबाईप्रमाणे सोन्याने सजली आहे. डोईवर मुकुट आणि नाकात नथ असं अंबाबाईचं अभूतपूर्व रुप अपूर्वाने चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

जाहिरात

हा फोटो शेअर करत अपूर्वाने लिहिले आहे की… ‘नवरात्रीचा पहिला दिवस, रंग- पिवळा, देवी महालक्ष्मी (अंबाबाई). कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे 52 शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो. कोल्हापूर देवी महालक्ष्मी व अंबाबाई म्हणून ओळखली जाते. मी अणि माझ्या टीमने केलेला ऐक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!’ अपूर्वाचा हा फोटो पाहून चाहत्यांच्या डोळ्याचं जणू पारणं फिटलं आहे. अपूर्वाच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. हे वाचा-  विकी कौशल बनणार साराचा पती! रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार ही जोडी अपूर्वा दररोज ‘रात्रीस खेळ चाले 3’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. परंतु, आता अपूर्वाचं हे रूप पाहून चाहतेही चकित झाले आहेत. अपूर्वाने अंबाबाईच्या रूपातील फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अपूर्वाच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात