Appa Anni Bappa Trailer : सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव करून देणारा ‘बाप्पा'

Appa Anni Bappa Trailer : सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव करून देणारा ‘बाप्पा'

Appa Anni Bappa या मराठी सिनेमाचा गमतीशीर ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : बुद्धीची देवता असलेला गणपती बाप्पा हा आपल्या संकटांचे निवारण करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. प्रत्येकाचे विघ्न दूर करणारा हा 'विघ्नहर्ता' प्रत्येकाचा आवडता आहे. याच बाप्पाभोवती फिरणारी कथा आगामी ‘आप्पा आणि बाप्पा’ या सिनेमातून आपल्या समोर येणार आहे. या सिनेमाचा गमतीशीर ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. गरिमा प्रोडक्शन्स् ची प्रस्तुती असलेल्या ‘सन ऑफ सरदार’ व ‘अतिथी तुम कब जाओंगे’ या चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्याचा ‘आप्पा आणि बाप्पा’ हा पहिलाच मराठी चित्रपट 11 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव करून देत हा ‘बाप्पा’, गोविंद कुलकर्णी म्हणजेच आप्पाच्या आयुष्यातील विघ्ने कशी दूर करणार? याची रंजक कथा या सिनेमात मांडली आहे. सण आणि उत्सवासंबंधीची आजची वास्तविकता आणि त्यातून होणारी सर्वसामान्यांची कोंडी यावर मार्मिक पण तितकाच परखड प्रकाशझोत या सिनेमातून टाकला आहे. सुबोध भावे आणि भरत जाधव यांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

#Ageism : बॉलिवूडमध्ये आता नवा वाद, नीना गुप्ता यांनी उठवला आवाज

याप्रसंगी उपस्थित प्रत्येक कलाकाराने गणपती बाप्पासोबतचे आपले नाते सांगताना आयुष्याच्या वाटेवर ‘दिशादर्शक’ ठरणारा हा ‘विघ्नहर्ता’ साद घालणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मदतीला धावून येतोच हे आवर्जून सांगितले.या सिनेमाचा ट्रेलर पाहताना अक्षय कुमारच्या 'ओह् माय गॉड'ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. OMG आणि ‘आप्पा आणि बाप्पा’ मध्ये बरंच साधर्म्य पाहायला मिळतं.

रानू मंडलवर सलमानची पहिली प्रतिक्रिया, घर दिल्याच्या प्रश्नावर म्हणाला...

भरत जाधव, सुबोध भावे, दिलीप प्रभावळकर, संपदा कुलकर्णी, शिवानी रांगोळे, उमेश जगताप याच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. गरिमा धीर व जलज धीर या चित्रपटाचे निर्माते आहेत. अश्वनी धीर व अरविंद जगताप यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. 11ऑक्टोबरला ‘आप्पा आणि बाप्पा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Laal Kaptan Trailer: 'नागा साधूचा खुनी खेळ', सैफचं अंगावर शहारे आणणारं हिंसक रुप

================================================

स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO

Published by: Megha Jethe
First published: September 24, 2019, 6:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading