मुंबई 1 एप्रिल**:** बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गरोदर असतानाही चित्रपटांत काम करत होती. आई झाल्यानंतर अडीच महिन्यांनी पुन्हा चित्रपटांत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अनुष्कानं शूटिंग सुरू केल्यानंतर सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. या नव्या फोटोंसोबतच अनुष्काच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडिओ (Throwback Video) प्रचंड व्हायरल होत आहे. 11 जानेवारीला अनुष्का आणि विराटला कन्यारत्न झालं. त्यानंतर 31 मार्चला अभिनेत्री अनुष्काने सेटवर येऊन काम सुरू केलं. ती सेटवर दिसल्यावर तिचा एक ध्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर दिसायला लागला. आणि तो प्रचंड व्हायरल झाला. ज्येष्ठ अभिनेत्री सिमी गरेवाल यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात अनुष्का गेली होती. अवश्य पाहा - सना खान पितेय सोन्याची कॉफी; किंमत पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क या व्हिडिओत दिसतं सिमी अनुष्काला विचारतात लग्न करणं अनुष्कासाठी महत्त्वाचं आहे का? अनुष्का म्हणते, ‘ हो माझ्या दृष्टिनी लग्नाला खूप महत्त्व आहे. मला लग्न करायचंय. मला मुलं व्हावीत अशीही इच्छा आहे आणि लग्नानंतर बहुतेक मी चित्रपटांत कामही करणार नाही.’
अवश्य पाहा - Rajnikant यांनी पटकावला Dadasaheb Phalke पुरस्कार; मिळणार किती रुपयांचं बक्षिस? अनुष्का आपल्या व्हॅनिटी व्हॅनमधून उतरतानाचे तिचे ताजे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. त्यात अनुष्कानी पांढऱ्या रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्स घातली आहे. ती एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी आली होती. तिनी दोन महिन्यांनी काम करायचं ठरवलं होतं पण या जाहिरातीच्या शूटिंगसाठी मुलीच्या जन्माला दोन महिने पूर्ण होण्याआधीच ती घराबाहेर पडली. सोशल मीडियावर लगेच याची दखल घेत तिचा थ्रोबॅक व्हिडिओ प्रसिद्ध झाला जणू तू काय म्हणाली होतीस अशी विचारणाच ही मंडळी करत आहेत. सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य हे तसं खूप लपून राहत नाही पण त्यांनाही त्याची सवय असते. तसंच त्यांच्या खासगी वागण्यावरही सध्या सोशल मीडियातून प्रचंड मतं व्यक्त होतात. तसाच काहीसा प्रकार इथं सुरू झाला लोकांनी अनुष्काच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अनुष्का बरेच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. 2018 मध्ये ती शाहरूख खानच्या झीरो चित्रपटात दिसली होती. गेल्यावर्षी तिने अमेझॉन प्राइमसाठी पाताल लोक या वेब सीरिजची तर नेटफ्लिक्ससाठी बुलबुल या वेबसीरिजची निर्मिती केली होती. त्यामुळे अभिनेत्रीसोबतच अनुष्का शर्मा आता एक निर्मातीही आहे. तिच्या पाताल लोक वेबसीरिजला प्रचंड लोकप्रियता आणि आर्थिक यशही मिळालं. ही तिची पहिली निर्मिती होती.