जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sana Khan पितेय सोन्याची कॉफी; किंमत पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

Sana Khan पितेय सोन्याची कॉफी; किंमत पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

Sana Khan पितेय सोन्याची कॉफी; किंमत पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

तिनं जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफामधील (Burj Khalifa) एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओमध्ये ती चक्क सोन्याची कॉफी पिताना दिसत आहे. या कॉफीची किंमत पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 1 एप्रिल**:** प्रसिद्ध अभिनेत्री सना खाननं (Sana Khan) व्यवसायिक अनस सईदसोबत लग्न (Anas Saiyad) करण्यासाठी बॉलिवूडला रामराम ठोकला. मात्र अभिनयसृष्टी सोडूनही तिची फॅनफॉलोईंग बिलकूल कमी झालेली नाही. उलट तिनं पोस्ट केलेला प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतो. दरम्यान तिनं जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफामधील (Burj Khalifa) एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओमध्ये ती चक्क सोन्याची कॉफी पिताना दिसत आहे. या कॉफीची किंमत पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. सनाच्या पतीनं तिला सरप्राईज देण्यासाठी बुर्ज खलीफामध्ये नेलं होतं. या इमारतीच्या 122 व्या मजल्यावर एक प्रसिद्ध रेस्तरॉट आहे. हे रेस्तरॉट आपल्या खास प्रकारच्या कॉफींसाठी जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी सनानं गोल्ड प्लेटेड कॅपेचीनो घेतली. या कॉफीची किंमत 160 दिरहम इतकी आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास 3200 रुपये. या कॉफीमध्ये खऱ्या खुऱ्या सोन्याचा वापर केला जातो, असा दावा सनानं केला आहे. अन् या कॉफीचे फोटो आणि व्हिडीओ देखील तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. ही कॉफी पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अवश्य पाहा - Rajnikant यांनी पटकावला Dadasaheb Phalke पुरस्कार; मिळणार किती रुपयांचं बक्षिस?

जाहिरात

सना खान ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध होती. ‘बिग बॉस’च्या सहाव्या सिझनमुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी तिनं गुजरातमधील एका व्यवसायिकाशी लग्न करण्यासाठी बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. तिनं 20 नोव्हेंबर रोजी मौलाना मुफ्ती अनसशी लग्न केलं. यापूर्वी ती प्रसिद्ध कोरिओग्राफर मेल्विन लुईससोबत रिलेशनशिपमध्ये देखील होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात