मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /HBD Anuradha Paudwal: एकेकाळी लतादीदींसाठी ठरलेल्या चॅलेंज; या एका निर्णयामुळे संपलं करिअर

HBD Anuradha Paudwal: एकेकाळी लतादीदींसाठी ठरलेल्या चॅलेंज; या एका निर्णयामुळे संपलं करिअर

महान संगीतकार ओ. पी. नैयर (Music Director) यांनी अनुराधा पौडवाल यांचं गाणं जेव्हा ऐकलं तेव्हा ते म्हणाले होते की आता लता मंगेशकरांचा जमाना संपला. अनुराधा पौडवाल त्यांची जागा घेईल.

महान संगीतकार ओ. पी. नैयर (Music Director) यांनी अनुराधा पौडवाल यांचं गाणं जेव्हा ऐकलं तेव्हा ते म्हणाले होते की आता लता मंगेशकरांचा जमाना संपला. अनुराधा पौडवाल त्यांची जागा घेईल.

महान संगीतकार ओ. पी. नैयर (Music Director) यांनी अनुराधा पौडवाल यांचं गाणं जेव्हा ऐकलं तेव्हा ते म्हणाले होते की आता लता मंगेशकरांचा जमाना संपला. अनुराधा पौडवाल त्यांची जागा घेईल.

    नवी दिल्ली 27 ऑक्टोबर : आपल्या सुरेल, नाजूक आणि तरीही दमदार आवाजामुळे श्रोत्यांच्या मनांवर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal Birthday) यांचा आज 66 वा वाढदिवस आहे. 90 च्या दशकात सर्वांत यशस्वी आणि लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांनी तो काळ इतका गाजवला की 50 च्या दशकापासून भारतातील चित्रपट संगीतावर अधिराज्य गाजवणाऱ्या लतादीदींशी (Lata Mangeshkar) त्यांची तुलना सुरू झाली होती. तेजाब, आशिकी, दिल हैं की मनता नही, बेटा, साजन, राम लखन, हिरो अशा एकापेक्षा एक सुपरहिट हिंदी चित्रपटांची गाणी अनुराधा पौडवाल यांनी गायली. त्यांचं करिअर इतकं बहरलं की त्या देशातल्या संगीतक्षेत्रावर अधिराज्य गाजवतील अशी शाश्वती सगळ्यांनाच त्या काळात वाटू लागली होती.

    Shweta Tiwari ने लेकीच्या पहिल्या म्युझिक व्हिडीओचा First Look केला शेअर...

    महान संगीतकार ओ. पी. नैयर (Music Director) यांनी अनुराधा पौडवाल यांचं गाणं जेव्हा ऐकलं तेव्हा ते म्हणाले होते की आता लता मंगेशकरांचा जमाना संपला. अनुराधा पौडवाल त्यांची जागा घेईल. अमिताभ बच्चन यांच्या ‘अभिमान’ या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी पहिल्यांदा गायन केलं होतं. यात त्यांनी एक श्लोक म्हटला होता तो खूपच लोकप्रिय झाला. त्यांच्या आवाजातला गोडवा ऐकून बॉलिवूडबरोबरच भक्तीसंगीत (Devotional Music) गाण्यासाठी अनुराधा यांना त्याकाळी ऑफर्स यायला लागल्या.

    काही दिवसांतच त्यांचं करिअर उंचीकडे झेपावलं. त्या काळच्या संगीतकारांना अनुराधा पौडवालांचं गाणं ऐकून असं वाटत होतं की त्याच पुढचा काळ गाजवतील. कॅसेट आणि म्युझिक कंपन्याही त्यांना नवनव्या ऑफर्स देत होत्या. टी सीरिज कॅसेट इंडस्ट्रीजचे (T-Series Cassettes Industries) मालक गुलशन कुमारदेखील अनुराधा पौडवाल यांना त्या काळातली लता मंगेशकर बनवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्यासाठी अनुराधा यांनी अनेक गाणी, भजनं गायली. अनुराधा पौडवाल यांनी हिंदी, मराठीसह अन्य भारतीय भाषांत गायलेली भजनं आजही घरोघरी ऐकली जातात.

    कतरिना-विकी करतायेत लग्नाची तयारी? 'या'ठिकाणी दिसले एकत्र, जाणून घ्या सर्व डिटेल

    अनुराधा यांचे पती अरुण पौडवाल हे एक मोठे संगीतकार होते. त्यांचं 1990 मध्ये निधन झालं. त्यानंतर त्या पूर्ण खचल्या होत्या. त्यानंतर त्यांनी एक निर्णय जाहीर केली की त्या फक्त टी सीरिज (T-Series) कंपनीसाठीच गाणं म्हणतील. हा निर्णय चुकला आणि इतर कंपन्यांनी त्यांना काम देणं बंद केलं. त्यानंतर त्यांनी भजनं आणि भक्तीगीतं गायली आणि त्यातच त्या आनंदी राहिल्या.

    अनुराधा पौडवाल यांचा आज 66 वा वाढदिवस आहे. त्यांना दीर्घायुष्य व चांगला आरोग्य लाभो अशा त्यांना शुभेच्छा देऊया.

    First published:

    Tags: Birthday celebration, Singer