जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Anupam Kher: शूटिंगदरम्यान अनुपम खेर यांना दुखापत; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Anupam Kher: शूटिंगदरम्यान अनुपम खेर यांना दुखापत; पोस्ट शेअर करत दिली माहिती

अनुपम खेर

अनुपम खेर

अनुपम खेर नुकतेच चित्रपटाच्या सेटवर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्याने स्वतः पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 मे:  अनुपम खेर हे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहेत. चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका करून त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे. वर्षानुवर्षे अनुपम खेर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवत आहेत. त्यांच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होत आलं आहे. पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक चिंतेची बाब समोर येत आहे. अनुपम खेर नुकतेच चित्रपटाच्या सेटवर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्याने स्वतः पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. अनुपम खेर नुकतेच त्यांच्या आगामी ‘विजय 69’ या चित्रपटाचं शूटिंग करत होते. याच चित्रपटाच्या सेटवर शूटिंग दरम्यान अनुपम खेर जखमी झाले. अनुपम यांनी सोमवारी सकाळी इन्स्टाग्रामवर हात फॅक्चर असलेला एक फोटो शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. हाताला फॅक्चर असलं तरी कॅमेरासमोर पोज देताना अनुपम खेर यांच्या चेहऱ्यावर हसू आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अनुपम यांनी पोस्टमध्ये खुलासा केला की, “तुम्ही एका स्पोर्ट फिल्ममध्ये काम करताय आणि तूम्हाला काही दुखापत होणार नाही असं कसं होऊ शकतं? दुखत आहे, पण जेव्हा हे स्लिंग खांद्यावर ठेवणाऱ्याने सांगितले की, त्याने शाहरुख खान आणि हृतिक रोशनवर सुद्धा हे उपचार केले आहेत, तेव्हा माझं दुखणं जरा कमी झालं.” अनुपम पुढे म्हणाले, “मी जरा जोरात खोकलो, तर माझ्या तोंडातून एक छोटीशी किंकाळी नक्कीच बाहेर पडते! पण या फोटोत हसण्याचा प्रयत्न खरा आहे! काही दिवसांनी शूटिंग पुन्हा सुरू होईल.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. रणबीर कपूरसोबत सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर डिप्रेशनमध्ये मध्ये होती अभिनेत्री; 5 वर्षानंतर केला खुलासा अभिनेत्याने पुढे लिहिले, “बाय द वे, जेव्हा आईने हे ऐकले, तेव्हा ती म्हणाली, “सांग अजून सगळ्यांना तुझ्याबद्दल, तुला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे.’ अनुपमच्या या फोटोवर प्रतिक्रिया देताना नीना गुप्ता यांनी विचारले, “अरे हे तुला काय झालं?” त्यावर अनुपम  उत्तर देत म्हणाले की, “तुझ्या आणि माझ्यासारख्या महान अभिनेत्यांचे असेच होते! किरकोळ दुखापती.”

जाहिरात

या महिन्याच्या सुरुवातीला अनुपम यांनी त्यांच्या नवीन चित्रपट ‘विजय 69’ ची घोषणा केली होती. हा चित्रपट अशा एका व्यक्तीवर आधारित आहे जो वयाच्या ६९ व्या वर्षी ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतो. विजय 69 चे दिग्दर्शन अक्षय रॉय करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात