करिश्माने टीव्ही शो, चित्रपटांसह अनेक वेब सीरिजमध्ये काम केले आहे. पण संजू या चित्रपटातून तिला विशेष प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात करिश्माने संजूच्या बेस्ट फ्रेंडची प्रेयसी पिंकीची भूमिका साकारली होती.
'संजू' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला होता, पण त्याचा फायदा या अभिनेत्रीला झाला नाही. हा प्रदर्शित झाल्यानंतर एक वर्ष ती बेरोजगार होती.
यादरम्यान ती 'डिप्रेशनच्या टप्प्यातून' जात होती, कारण तिला इंडस्ट्रीकडून खूप अपेक्षा होत्या, पण काही विशेष घडले नाही. असा खुलासा करिश्मा तन्ना हिने केला आहे.
करिश्मा तन्नाने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मला वाटले की संजू मला छोटी भूमिका असली तरी त्यानंतर मला अनेक संधी मिळतील. मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. चित्रपटानंतर मला ज्या प्रकारचा प्रतिसाद, चित्रपट किंवा प्रकल्प अपेक्षित होते ते आले नाहीत. सात-आठ महिने किंवा 1 वर्ष मी काम करत नव्हते.'
ती पुढे म्हणाली, 'मला इंडस्ट्रीकडून खूप आशा होत्या की मला आता (संजू नंतर) काम मिळेल. या दरम्यान मी नैराश्याच्या गेले होते. मला वाटलं माझं आयुष्य बेरंग आहे. मला माझ्या करिअरचे काय करावे हेच कळत नव्हते.'
करिश्माने खुलासा केला कि, 'मी लोकांना मेसेज करत होते, 'तुम्ही संजू पाहिला का?' 'तुम्हाला माझा अभिनय आवडला का?' माझ्यासोबत फक्त आई होती. माझी आई खूप संवेदनशील आहे.'
ती पुढे म्हणाली, 'मी त्यावेळी कोणत्या स्थितीतून जात होते हे माझ्या मित्रांना समजणार नाही, कारण त्यांच्यापैकी कोणीही इंडस्ट्रीतील नाही. मी स्वतःला प्रेरित केले. ती म्हणाली, 'मी स्वतःला त्या टप्प्यातून कसे बाहेर काढले हे फक्त मलाच माहीत आहे.'
करिश्मा तन्ना लवकरच 'स्कूप' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. यामध्ये ती मुख्य भूमिकेत आहे. ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर २ जून रोजी प्रदर्शित होईल.