जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अनिल कपूरने हात जोडत अनुपम खेर यांना केली ही विनंती, पाहा Video!

अनिल कपूरने हात जोडत अनुपम खेर यांना केली ही विनंती, पाहा Video!

अनिल कपूरने हात जोडत अनुपम खेर यांना केली ही विनंती, पाहा Video!

अनुपम खेर ( Anil Kapoor) सोशल मीडियावरही नेहमीच सक्रीय असतात. आपल्या आगामी सिनेमांच्या प्रकल्पांसह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ते तिथे टाकत असतात. आज खेर यांनी एक मस्त विनोदी व्हिडिओ शेअर केला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 मे: अनुपम खेर  (म म्हणजे उत्स्फूर्त अभिनय, विनोदाचे अफलातून टायमिंग आणि वैविध्यपूर्ण भूमिकांनी सिनेरसिकांच्या मनावर राज्य करणारे नाव. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अनुपम खेर यांची एक विनोदी पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे. अनुपम खेर ( Anil Kapoor)  सोशल मीडियावरही नेहमीच सक्रीय असतात. आपल्या आगामी सिनेमांच्या प्रकल्पांसह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ते तिथे टाकत असतात. आज खेर यांनी एक मस्त विनोदी व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांच्यासह अभिनेता अनिल कपूरही   दिसत आहे. वाचा- अभिनेत्रीच्या कुटुंबात नवीन सदस्याची एंट्री, फोटो पोस्ट करत म्हणाली….. अभिनेता अनिल कपूर आणि खेर हे जुने दोस्त आहेत. दोघांनीही अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. या व्हिडिओत दिसते आहे की, अनिल कपूर आणि अनुपम खेर दोघे एकत्र सिनेमा पाहण्यासाठी गेले आहेत. एकमेकांविषयी अगदी मिश्कील कमेंट्स करत दोघांनी व्हिडिओ केला आहे. वाचा- अक्षया देवधरच्या साखरपुड्याचे फोटो पाहून एक्स बॉयफ्रेंड म्हणाला.. यात अनिल कपूर म्हणताना दिसत आहे की, “आज मला इतका आनंद झाला आहे, की जणू मी एखाद्या डेटवर गेलो आहे. मला माझे झेवियर्स कॉलेजचे दिवस आठवत आहेत.” यावर अनुपम खेर हसून दाद देतात. पुढे अनुपम खेर म्हणतात, “आज आपण आरआरआर सिनेमा पहायला आलो आहोत. मी आणि राजमौली यांच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे, आम्ही दोघेही 300 कोटी क्लबमधले आहोत. राजमौली तसा माझ्याही पुढे आहे.” यावर अनिल कपूर हात जोडत अनुपम खेर यांना म्हणतो, “मी बिचारा 30 कोटीच्या क्लबमधला आहे. माझ्यावर तुमची कृपा असू द्या. मलाही 300 कोटीच्या क्लबमध्ये येण्यासाठी आशिर्वाद द्या.” यावर खेरसुद्धा हसून आशिर्वादासाठी हात उंचावत अनिल कपूरला ‘जुग जुग जिओ’ म्हणताना दिसत आहेत.

Koo App Went to the theatre after many many years with my dearest and humorous friend #AnilKapoor to watch #JoyOfCinemas #RRR. This hilarious conversation is before the film. Have fun & Enjoy. #Friends #JoyOfCinemas View attached media content

- Anupam Kher (@anupampkher) 2 May 2022

जाहिरात

‘खूप काळानंतर मी सिनेमा पहायला म्हणून थिएटरमध्ये गेलो. प्रिय मित्र अनिल कपूरसह आरआरआर पाहण्याचा अनुभव काही औरच!’ असे सांगत 1 मिनीट 33 सेकंदांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात