जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अक्षया देवधरच्या साखरपुड्याचे फोटो पाहून एक्स बॉयफ्रेंड म्हणाला..

अक्षया देवधरच्या साखरपुड्याचे फोटो पाहून एक्स बॉयफ्रेंड म्हणाला..

अक्षया देवधरच्या साखरपुड्याचे फोटो पाहून एक्स बॉयफ्रेंड म्हणाला..

3 मे रोजी अक्षया देवधरनं राणादा म्हणजे हार्दिक जोशी याच्यासोबत साखरपुडा केला आहे.चाहत्यांसह सेलेब्सकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण या सगळ्यात एक कमेंट मात्र सर्वांचे लक्षवेधून घेत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 मे- तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अंजलीच्या भूमिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधरला वेगळी ओळख मिळाली. अंजलीपेक्षा ‘पाठकबाई’ या पात्राच्या माध्यमातुन आणखी नावाजली गेली. 3 मे रोजी अक्षया देवधरनं याच मालिकेतल राणादा म्हणजे हार्दिक जोशी याच्यासोबत साखरपुडा केला आहे. ऑनस्क्रीन नवऱ्यासोबतच तिनं साखरपुडा केला आहे. लवकरच हे कपल आता लग्न करणार असल्याची (akshaya deodhar hardeek joshi egngagement ) चर्चा रंगली आहे. चाहत्यांसह सेलेब्सकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण या सगळ्यात एक कमेंट मात्र सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. काहींच्या लक्षात आले देखील असेल. ही कमेंट अक्षयाच्या एक्स बॉसफ्रेंडनं केली आहे. अक्षया देवधर एका अभिनेत्याच्या प्रेमात होती. ती कधीच तिच्या या नात्याबद्दल बोलली नाही पण तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून नेहमीच ती या ( suyash tilak and akshaya deodhar relationship ) अभिनेत्यासोबत प्रेमात असल्याची चर्चा रंगलेली असतं. हा अभिनेता म्हणजे सुयश टिळक होय. अक्षया देवधरनं साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर सुयश कमेंट करत तिच्या या नवीन प्रवासाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सुयशची ही कमेंट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

News18

सुयश टिळक आणि अक्षया देवधरचं ब्रेकअप झाल्यानंतर इन्स्टावर एकमेकांना अनफॉलो केलं होतो. आज मात्र सुयशनं अक्षयाला तिच्य़ा नवीन प्रवासाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांनी कधीच समोर येऊन आपलं नात्य मान्य केलं नव्हत. शिवाय ब्रेकअपवर कधी बोलले नाहीत. सुयशनं अक्षयासोबतच्या ब्रेकअपनंतर अभिनेत्री आयुषी भावे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या दोघांचा सुखाचा संसार सुरू आहे. तर अक्षयानं देखील हार्दिकसोबत आयुष्यभरासाठी एंगेज झाली आहे. वाचा- अक्षया देवधर-हार्दिक जोशीचा असा पार पाडला साखरपुडा, रोमॅंटिक Video Viral इन्स्टाग्राममुळे रंगली होती अफेअरची चर्चा सुयश टिळक आणि अभिनेत्री अक्षया देवधरनं आपल्या नात्याची जाहीर कबुली कधीच दिली नसली, तरी सोशल मीडियावरुन त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा चाहत्यांमध्ये नेहमी होत असे. अक्षया देवधर आणि सुयश टिळक यांच्या प्रेमकथेविषयी लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कळले होते. वाचा- शुभमंगल सावधान! अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर शिवानी- विराजसनं बांधली लग्नगाठ अक्षयाने इन्स्टाग्रामवर सुशयसोबतचा एक फोटो शेअर करताना त्याखाली, ‘मिसिंग यू…लव्ह’ असे लिहिले होते. तर सुयशनेही ‘मिस यु टु….लिहीले होते.’ त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी खिचडी शिजत असल्याचा अंदाज चाहत्यांना आला होता. दोघांचं एकत्र दिसणं, फिरणं यांत काही नवं चाहत्यांसाठीही नवीन काही राहिलं नव्हते. अक्षया आणि सुयश एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर झळकू लागल्यावर. कधी त्या फोटोंना ‘मिस यू’ कॅप्शन असायचं, तर कधी हार्ट शेप इमोजी, कधी अक्षयाच्या बोटातील अंगठी चाहत्यांचं लक्ष वेधून घेऊ लागली. दोघांचा साखरपुडा झाल्याचही चाहत्यांनीच शिक्कामोर्तब केलं. मात्र याला अक्षया किंवा सुयशपैकी कोणीही कधीच दुजोरा दिला नव्हता. मात्र काही काळानंतर या दोघाचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात