मुंबई, 4 मे- अभिनेत्री मीनल बाळ**( minal bal )** सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध फोटो व व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर ( minal bal latest post ) करत असते. नुकतीच तिनं चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. मीनलनं अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर नवीन कारची ( minal bal new car ) खरेदी केली. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिनं याबद्दल माहिती दिली आहे. मीनल बाळनं नवीन कार खरेदी केली आहे. तिनं फोटो शेअर करत म्हटलं आहे की, welcome home Ciaz❤️❤️❤️अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुझं स्वागत आहे आता इथून पुढचा प्रवास तुझ्या बरोबर……… तिनं घेतलेल्या Ciaz कारची स्टारटिंग किंमत 8 लाखांपासून ते 14 लाखांपर्यंत आहे. कोरोनामुळे मागच्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांना काम मिळत नव्हत किंवा अनेकांना कामचं नव्हतं. मात्र आता मनोरंजन विश्व पुन्हा नव्या दमानं सुरू झालं आहे. आता यानंतर अनेक कलाकार नवीन घर, गाडी अशी खरेदी करताना दिसत आहे.
मीनलने भेटली तू पुन्हा, इरादा पक्का यासारख्या सिनेमात मीनल काम केले आहे. तेसच तिनं हिंदी व मराठी मालिकांमध्ये अभिनयाचा ठसा उमठवला आहे.. मनोरंजन विश्वात काम मिळवण्यासाठी खूप पापड बेलावे लागतात असं म्हणतात. अनेक कलाकार याबद्दल व्यक्त देखील होतात. यापैकी काहींचे अनुभव चांगले आहेत तर काहींचे वाईट देखील आहेत. मीनलनं देखील तिच्या याच अनुभवाबद्दल एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. काम मिळवण्यासाठी कसं गोड गोड वागावं लागतं, प्रोजेक्ट शी संबंधित असलेल्यांची छान छान वागावं लागतं तेव्हा जाऊन कुठे सिनेमा मालिका किंवा वेबसीरीज मध्ये वर्णी लागते असं म्हणत एक फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टमुळे ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली होती.