मुंबई, 12 डिसेंबर: बी टाउनमध्ये सध्या सनई चौघडेचेच सुर ऐकायला मिळत आहेत. अभिनेत्री कटरिना कैफ (Katrina Kaif)आणि अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal) नंतर आता आणखी एक क्यूट कपल लग्नबेडीत अडकणार आहे. अंकिता लोखंडे(Ankita Lokhande ) लवकरच बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत (Vicky Jain ) लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. काल अंकिताची मेहंदी सेरेमनी झाली. त्याचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अंकिता आणि विकी दोघेही दोन दिवसांनी म्हणजेच 14 डिसेंबर रोजी मुंबईत 7 फेऱ्या (Ankita Lokhande-Vicky Jain Wedding) घेणार आहेत. तत्पूर्वी, शनिवारी (11 डिसेंबर) अंकिता लोखंडेचा मेहंदी सोहळा पार पडला, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
अंकिताच्या हातांवर विकीच्या नावाची मेहंदी सजली आहे. यावेळी अंकिताच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता. अंकिताच्या हातावर मेहंदी काढणारी आर्टिस्ट दुसरी कुणी नसून वीणा नागदा होती. होय, याच वीणाने कतरिनाच्या हातावरही मेहंदी काढली होती.
View this post on Instagram
पारंपारिक ड्रेसमध्ये परिधान केलेल्या अंकिताची प्री-वेडिंग ग्लो पाहायला मिळत आहे. तिचं हसू लग्नापूर्वीच्या लुकमध्ये भर घालत आहे. दरम्यान, विकी ढोल-ताशाच्या तालावर जोरदार नाचला असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे.
View this post on Instagram
अंकिता व विकी येत्या 14 डिसेंबरला लग्नबंधणार अडकणार आहेत. आज 12 डिसेंबरला दोघांचा साखरपुडा होणार आहे. 13 तारखेला हळद आणि संगीत सेरेमनी आयोजित केली आहे. या लग्नात अंकिता व विकीचे काही जवळचे मित्र व कुटुंबीय सहभागी होणार आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाचे विधी गेल्या आठवड्यात सुरू झाले आहेत.
View this post on Instagram
अंकिता लोखंडेच्या मेहंदी सोहळ्याची छायाचित्रे समोर येताच आता तिचे चाहते तिला या नव्या प्रवासाच्या सुरुवातीसाठी शुभेच्छा देत आहेत. यापूर्वी, अभिनेत्रीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अंकिता आणि विकीच्या प्री वेडिंग शूटचा हा व्हिडिओ होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ankita lokhande, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal, Wedding