मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'आयुष्यात खूप अप्स अँड डाऊन्स आले पण...', सुशांत सिंहबरोबरच्या ब्रेकअपबद्दल बोलली अंकिता लोखंडे

'आयुष्यात खूप अप्स अँड डाऊन्स आले पण...', सुशांत सिंहबरोबरच्या ब्रेकअपबद्दल बोलली अंकिता लोखंडे

सुशांत बरोबरच्या ब्रेक अप बद्दल अंकिता फारशी कधी बोलताना दिसत नाही. मात्र आज न्यूज18 लोकमतच्या फेसबुक Live मध्ये अंकिताने याबाबत भाष्य केलं आहे.

सुशांत बरोबरच्या ब्रेक अप बद्दल अंकिता फारशी कधी बोलताना दिसत नाही. मात्र आज न्यूज18 लोकमतच्या फेसबुक Live मध्ये अंकिताने याबाबत भाष्य केलं आहे.

सुशांत बरोबरच्या ब्रेक अप बद्दल अंकिता फारशी कधी बोलताना दिसत नाही. मात्र आज न्यूज18 लोकमतच्या फेसबुक Live मध्ये अंकिताने याबाबत भाष्य केलं आहे.

मुंबई, 27 एप्रिल : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ही टेलिव्हिजनवरील ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन अशी सर्वांची आवडती जोडी होती. सुशांत आणि अंकिता जवळपास 10 वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र आता हे दोघंही वेगळे झाले असून सध्या सुशांत रिया चक्रवर्तीला डेट करत आहे तर अंकिता विकी जैनला डेट करत आहे. दरम्यान सुशांत बरोबरच्या ब्रेक अप बद्दल अंकिता फारशी कधी बोलताना दिसत नाही. मात्र आज न्यूज18 लोकमतच्या फेसबुक Live मध्ये अंकिताने याबाबत भाष्य केलं आहे.

(हे वाचा-लग्नानंतर शाहरुख खान बोलला होता गौरीशी खोटं, पॅरिस सांगून घेऊन गेला 'या' ठिकाणी)

जेव्हा एका फॅनने तिच्या आणि सुशांतच्या ब्रेकअप बद्दल विचारलं त्यावेळी आयुष्यात खूप बदल होतात अशी प्रतिक्रिया दिली आहे.  या काळात पुन्हा उभं राहण्यासाठी कुटुंबाचा आधार असणं नेहमीच गरजेचं आहे असं म्हटलं. ती म्हणाली की, आयुष्यात खूप अप्स अँड डाउन्स येतात, खूप लोकं येतात आणि जातात पण परिवार असा असतो की जो कायम आपल्या बरोबर असतो. तिने नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा सल्ला दिला आहे.

सध्या चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन जगतातील सर्वच कलाकार लॉकडाऊनमुळे घरीच आहेत. प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे. हे सर्व कलाकार त्यांच्या फॅन्सशी जोडले राहण्याचं एकमेव साधन म्हणजे सोशल मीडिया. दरम्यान न्यूज18 लोकमतच्या फेसबुक पेजवर अनेक कलाकारांनी Live करत त्यांच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या आहेत. आज तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन वरील आघाडीची अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने हजेरी लावली होती.

First published:
top videos

    Tags: Pavitra rishta, Sushant singh raajpoot