लग्नानंतर शाहरुख खान बोलला होता गौरीशी खोटं, हनीमूनसाठी पॅरिस सांगून घेऊन गेला 'या' ठिकाणी
सध्या लॉकडाऊनमध्ये नवीन चित्रपट प्रदर्शित होत नसले तरी बॉलिवूड कलाकारांचे जुने किस्से पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. असाच एक किस्सा घडला होता किंगखान शाहरुख आणि पत्नी गौरी खानबरोबर.


बॉलिवूडमध्ये असे अनेक फेव्हरिट कपल्स आहेत, ज्यांचे किस्से नेहमीच चर्चेत राहतात. अभिनेता शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान हे या कपल्सपैकीच एक! (सौजन्य- इन्स्टाग्राम @gaurikhan)


लॉकडाऊमध्ये नवीन चित्रपट किंवा नवीन सीरियल्स येत नाही आहेत. त्यामुळे अनेक फॅन्स त्यांच्या फेव्हरिट कपलच्या रिलेशनशीपबाबत सोशल मीडियावर चर्चा करत आहेत. (सौजन्य- इन्स्टाग्राम @gaurikhan)


गौरी आणि शाहरुखच्या लग्नाला 27 वर्ष झाली आहेत. दोघांमध्ये आजही तेवढच प्रेम पाहायला मिळतं. दरम्यान या दोघांच्या हनीमूनचा एक किस्सा आहे. जेव्हा हनीमूनला जायचं होतं, तेव्हा शाहरुख गौरीशी खोटं बोलला होता. (सौजन्य- इन्स्टाग्राम @gaurikhan)


27 वर्षांपूर्वी जेव्हा शाहरुखने गौरीशी लग्न केलं तेव्हा तो त्याचा खडतर काळ होता. शाहरुख बॉलिवूडमध्ये त्याचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होता. (सौजन्य- पिंकव्हिला)


गौरीवर त्याचं खूप प्रेम असल्यामुळे तिची प्रत्येक इच्छा त्याला पूर्ण करायची होती. त्याचा हा हनीमूनचा किस्सा त्याने एका पुरस्कार सोहळ्यामध्ये सांगितला होता. (सौजन्य- इन्स्टाग्राम @gaurikhan)


एका पुरस्कार सोहळ्यामध्ये विकी कौशलने शाहरुख-गौरीचा हनीमूनच्या वेळेचा फोटो दाखवत त्यामागची कहाणी विचारली. तेव्हा शाहरुख म्हणाला की हा त्याच्या सर्वात आवडत्या फोटोंपैकी एक आहे. (सौजन्य- पिंकव्हिला)


शाहरुख म्हणाला की, त्यांचं लग्न झालं तेव्हा तो अगदी गरीब कुटुंबातील होता तर गौरी मध्यमवर्ग कुटुंबातील. मात्र जसं सर्वजण आपल्या बायकोला वचन देतात त्याचप्रमाणे शाहरुखने देखील गौरीला पॅरिस फिरवण्याचं आणि आयफेल टॉवर दाखवण्याचं वचन दिलं


तो पुढे म्हणाला की, मात्र हे खोटं होतं कारण त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. (सौजन्य- इन्स्टाग्राम @gaurikhan)


शाहरुखने सांगितलं की, त्यावेळी राजू बन गया जेंटलमनचं शूटिंग सुरू होतं. त्यावेळी त्याने विचार केला की तसही गौरीने पॅरिस बघितलं नसेल. म्हणून तो तिला लग्नानंतर 15-20 दिवसांनी पॅरिस ऐवजी दार्जीलिंग घेऊन गेला. एक आदर्श कपल म्हणून शाहरुख गौरीकडे पाहिलं जातं. आर्यन अगदी बाळ असतानाचा हा फोटो देखील अत्यंत गोड फोटो आहे. (सौजन्य- पिंकव्हिला)


शाहरुख आणि 18 वर्षांच्या गौरीची ओळख एका पार्टीमध्ये झाली होती. त्याच्याबरोबर डान्स करणारी ती पहिली मुलगी होती. 25 ऑक्टोबर 1991 मध्ये दोघांनी लग्न केलं.