मुंबई 29 जून: (Varun dhawan) वरुण धवन, (Kiara Advani) किआरा अडवाणी, (Anil Kapoor) अनिल कपूर, (Neetu Kapoor) नीतू कपूर अशी तगडी स्टारकास्ट असणारा ‘जुग जुग जियो’ (Jug Jug Jeeyo) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. अगदी हवी तशी मनासारखी कामगिरी आत्तापर्यंत तरी या चित्रपटाची झाली नसली तरी या चित्रपटाला रिस्पॉन्स मात्र उत्तम मिळतो आहे. रिलीज आधी मात्र या चित्रपटाबद्दल बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा होताना दिसत होती. या कलाकारांनी ‘चला हवा येऊ द्या’ या मराठी कार्यक्रमात सुद्धा हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी केलेला डान्स सध्या प्रचंड viral होताना दिसत आहे. व्हवुन किआरा यांनी सिनेमाच्या प्रमोशनसाठी काय नाही केलं. या सिनेमाची टीम मेट्रोमध्ये बसून आली. त्यांनी अनेक शोमध्ये आपली हजेरी लावली अगदी मॉलमध्ये जाऊन fan meet सुद्धा केली. त्यांनी हवा येऊ द्या कार्यक्रमात केलेली धमाल खूप गाजली होती. याच कार्यक्रमात त्यांनी केलेल्या डान्सची एक क्लिप सध्या प्रसिद्ध होत आहे. वरुण धवनने स्वतः इन्स्टाग्रामवर खास पोस्ट टाकत त्यांनी केलेला डान्स शेअर केला होता. हवा येऊ द्या च्या मंचावर ‘जुग जुग जियो’ची टीम सैराटमधल्या सुपरडुपर हिट ‘झिंगाट’ गाण्यावर मुक्तपणे (Jug Jug Jeeyo team dancing on Zingaat) थिरकताना दिसली. झकास हिरो अनिल कपूर यांनी आपल्या खास अंदाजात भाव खाल्ल्याचं सुद्धा व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या व्हिडिओवर वरुण कॅप्शन टाकत लिहितो की’ अनिल कपूर यांच्यासारखी एनर्जी सगळ्यांना मिळू दे’ झी मराठीच्या सोशल मीडियावरून सुद्धा हा विडिओ शेअर करण्यात आला आहे. हे ही वाचा- VIDEO: मीरा राजपूत पार्टीत झाली रोमँटिक; पती शाहिदला सर्वांसमोर केलं KISS
वरुण धवन, किआरा अडवाणी यांचा हा नवा चित्रपट एका फॅमिली ची गोष्ट सांगणारा आहे. फॅमिली drama असणारा हा चित्रपट सगळ्या इमोशनने भरलेला आहे. यात कॉमेडी आहे आणि हृदयाला स्पर्श करून जाणारे काही क्षण सुद्धा आहेत.
वर्क फ्रंटवर हे कलाकार सध्या बरेच बिझी आहेत. किआरा भुलभुलैय्या 2 च्या यशानंतर पुन्हा सिद्धार्थ मल्होत्रासोबत एका चित्रपटात दिसणार अशी चर्चा चालू आहे. वरुण येत्या वर्षात भेडिया, एक व्हिलन रिटर्न्स या फिल्ममधून समोर येणार असं सांगितलं जात आहे. अनिल कपूर येत्या काळात सडे सती चित्रपटात दिसणार असून कपूर यांच्या वाढदिवशी रिलीज होणाचे संकेत असणाऱ्या करणं जोहर दिग्दर्शित तख्त चित्रपटात सुद्धा ते असतील असं म्हणलं जात आहे.