मुंबई, 29 जून- समुद्र किनारा, डोंगरदऱ्या अथवा परदेशात हॉलिडे साजरा करण्यासाठी जाणारे बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. काही कलाकार तर खासगी आयुष्यातील क्षणही सोशल मीडियावर टाकून भरपूर पसंती मिळवतात. शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत (Meera Rajput) यांचा असाच एक रोमँटिक व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर (Instagram) पाहायला मिळतो आहे. यात मीरा शाहिदला आपल्याकडे ओढून त्याला किस करताना दिसते. शाहिद आणि मीरा यांच्या जोडीची सोशल मीडियावर सातत्याने चर्चा होत राहते. अनेकदा व्हिडिओ आणि फोटो टाकून आपल्या आयुष्यातील घडामोडींची माहिती ते सतत देत असतात. इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत शाहिद आणि मीरा हे जोडपे एका पार्टीत डान्स करताना दिसत आहेत. डान्स करतानाच मीरा शाहिदला स्वत:कडे ओढते व त्याला किस करते. व्हिडिओतील हा प्रसंग पाहून चाहत्यांच्याही नानाविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांना तो व्हिडिओ प्रचंड भावला आहे. शाहिद कपूर बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. पण मीराला सुद्धा मिळणारी पसंती खूप आहे. तिला सोशल मीडिया क्विन (Social Media Queen) म्हटलं तर वावग ठरणार नाही. पार्टीतील शेअर झालेल्या व्हिडिओंमध्ये पतीबरोबर रोमान्स करणारी मीरा अगदी बिनधास्त असल्याचं दिसतं. लव्ह नव्हे, शाहिद-मीराचं झालंय अरेंज मॅरेज- शाहिद आणि मीरा यांच्यातील प्रेम व नात्यासंदर्भात अनेकदा बातम्या समोर आल्या. मीरा दिल्लीतील रहिवासी आहे. 2015 मध्ये दोघांचा प्रेमविवाह नव्हे तर अरेंज मॅरेज झालं आहे. शाहिदने जेव्हा मीराशी लग्न करण्याचं ठरवलं तेव्हा त्याच्या अनेक चाहत्यांना सुखद धक्का बसला. कारण शाहिदचं नाव अनेक अभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं होतं. शाहिद हा यांच्यापैकी एखादीशी विवाह करणार असे वाटत असताना त्याने मीराशी विवाह करणे पसंत केले. मीरा शाहिदपेक्षा मोठी आहे. लग्नाच्या वेळी मीराचे वय 21 वर्ष होते. शाहिद-मीराला दोन अपत्य आहेत. **(हे वाचा:** VIDEO: ‘मी लग्नाआधीच GOOD NEWS…’, बोलता-बोलता हे काय बोलून गेली राखी सावंत? )
वडिल पंकज कपूरने शाहिदसाठी घातली लग्नाची मागणी- शाहिद हा वडिल पंकज कपूर यांच्यासोबत दिल्लीतील एका सत्संगासाठी जात असे. तिथेच त्याची मीराशी पहिली भेट झाली. याच ठिकाणी कपूर आणि राजपूत कुटुंबातील ऋणानुबंध वाढत गेले. याचदरम्यान शाहिद आणि मीरा यांच्यातही भेटीगाठी वाढत गेल्या. दोघांमध्ये सुरूवातीला मैत्री झाली त्यानंतर पंकज कपूर यांनी मीराच्या कुटुंबीयांकडे लग्नासाठी प्रस्ताव पाठवला. त्यानंतर शाहिद आणि मीरा विवाह केला. शाहिद व मीरा यांच्याप्रमाणे अनेक बॉलीवूड कलाकार अगदी बिनधास्तपणे त्यांच्या खासगी आयुष्यातील क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी त्यांना सोशल मीडियाचा एक चांगला पर्याय मिळालेला आहे.