मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Anil Kapoor : हातात तिरंगा घेत धावत सुटले अनिल कपूर; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Anil Kapoor : हातात तिरंगा घेत धावत सुटले अनिल कपूर; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Anil Kapoor

Anil Kapoor

अनिल कपूरने भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन अशा पद्धतीने साजरा केला आणि चाहते थक्क होत पाहतच राहिले.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 15 ऑगस्ट : देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडून 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 'हर घर तिरंगा' या उपक्रमात अनेक सेलिब्रिटींनीही भाग घेतला आहे. आज स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक कलाकार सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते अनिल कपूर यांनी अतिशय हटके पद्धतीने स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते बघून सगळे चाहते आश्चर्यचकित तर  फिटनेसप्रेमी खुश झाले आहेत. सदाबहार अभिनेता अनिल कपूर चा बॉलिवूडमध्ये अजूनही  करिश्मा आहे. वयाच्या 65 व्या वर्षीही अनिल कपूर एवढे तंदुरुस्त आहेत. अनिल कपूर यांची फिटनेस प्रेमींमध्ये खूप चर्चा असते. या वयातसुद्धा अनिल कपूर यांच्यामध्ये एखाद्या तरुणाला लाजवेल असा उत्साह आहे. अनिल कपूर नेहमीच चर्चेत  असतात.  अलीकडेच त्यांच्या  'जुग जुग जीयो' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. आता अनिल कपूर यांनी स्वातंत्र्यदिनाच्या त्यांच्याच शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.  भारताचा  75 वा स्वातंत्र्यदिन अनिल कपूर यांनी फिटनेस पाळत  साजरा केला. हेही वाचा - Milind Gawali : 'मी आर्मी किंवा पोलीस खात्यात गेलो असतो पण..' स्वातंत्र्यदिनानिमित्त मिलिंद गवळी दिला आठवणींना उजाळा अनिल कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी  एक व्हिडिओ शेअर केला. ते बघून त्यांचे चाहते थक्क झाले. या व्हिडिओमध्ये अनिल कपूर हे  हातात तिरंगा धरून खेळाच्या मैदानावर धावताना दिसत आहेत. अतिशय उत्साहात त्यांना धावताना पाहुनि चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. अनिल कपूर यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला वंदे मातरम हे गाणं  वाजत आहे.  या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी  लिहिले आहे कि, “भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे!!! आम्ही दिवसेंदिवस प्रगती करत अभिमानाने पुढे जात आहोत.जय हिंद #indiaat75 #iday2022 #स्वतंत्रतादिवस #amritmahotsav."
View this post on Instagram

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

अनिल कपूरचा देशाप्रती असलेला उत्साह  पाहून अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्याच्या देशभक्तीबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. पण अनिल कपूर यांच्या चाहत्याने एक भन्नाट कमेंट केली आहे. तो म्हणतोय, 'यार देश बुढा होगा, अनिल कपूर नही. एव्हरग्रीन अनिल कपूर को सलाम.' अशा  पद्धतीने चाहत्यांनी कौतुक केले आहे. एखाद्या तरुणासारखा उत्साह असणारे अनिल कपूर लवकरच आजोबा बनणार आहेत. त्याची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर हि प्रेग्नन्ट असून लवकरच एका बाळाला जन्म देईल. अनिल कपूर याबाबत खूपच उत्साही दिसत आहेत. ही बातमी माझा उत्साह दुणावणारी आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.
First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News

पुढील बातम्या