Home /News /entertainment /

रात्री उशिरा ‘या’ अभिनेत्यासोबत बाइकवर रोमान्स करताना दिसली अनन्या पांडे

रात्री उशिरा ‘या’ अभिनेत्यासोबत बाइकवर रोमान्स करताना दिसली अनन्या पांडे

सोशल मीडियावर अनन्या पांडेचे काही फोटो खूप व्हायरल होत आहेत. ज्यात ती बाइकवर रोमान्स करताना दिसत आहे.

  मुंबई, 01 मार्च : अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. अनन्या काही दिवसंपूर्वी कार्तिक आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या दोघांनी ‘पती पत्नी और वो’ या सिनेमात एकत्र काम सुद्धा केलं होतं. पण या दोघांनी त्यांच्यात नेमकं मैत्री आहे की आणखी काही याचा खुलासा कधीच केला नाही. पण आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमुळे अनन्या खूप चर्चेत आली आहे. ज्यात अनन्या साउथच्या एका अभिनेत्यासोबत बाइकवर रोमान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर अनन्या पांडेचे काही फोटो खूप व्हायरल होत आहेत. ज्यात ती साउथ अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत बाइकराइड एंजॉय करताना दिसत आहे. यावेळी अनन्यानं ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस घातला होता आणि ती विजयच्या मागे बाइकवर त्याला घट्ट पकडून बसली होती. तिचे हे फोटो त्यांचा आगामी सिनेमा ‘फायटर’च्या सेटवरील आहेत. या सिनेमाच्या शूटिंग सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. शूटिंग सुरू असताना सलमान माझ्याशी फ्लर्ट करायचा, अभिनेत्री भाग्यश्रीचा खुलासा
  अनन्यानं काही दिवसांपूर्वी विजय देवरकोंडासोबतचे काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. याशिवाय लवकरच इशान खट्टरसोबत 'खाली-पीली' या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. ज्यात हे दोघं टॅक्सीमध्ये बसलेले दिसत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीला अटक, पैशांसाठी झाली होती Porn Star
  विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ करत आहेत. हा सिनेमा हिंदी आणि तेलुगू या दोन भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहरनं केली आहे. ‘तू सेल्फ डिफेन्स का शिकत आहेस?’ अक्षयच्या प्रश्नावर चिमुरडीचं ठसकेबाज उत्तर
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Ananya pande, Bollywood

  पुढील बातम्या