मुंबई, 01 मार्च : अक्षय कुमार एक असा अभिनेता आहे जो मार्शल आर्टमध्ये निपुण आहे. तो नेहमीच सर्वांना सेल्फ डिफेन्स शिकण्याचा सल्ला देतो. खास करुन प्रत्येक महिला आणि मुलीनं सेल्फ डिफेन्स शिकायला हवं असा अक्षयचा आग्रह असतो. नुकतीच अक्षयनं एका सेल्फ डिफेन्स अकादमीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी त्याची भेट एका अशा मुलीशी झाली जिच्या ठसकेबाज उत्तरानं तो इम्प्रेस झाला. अक्षय कुमारनं वुमेन्स सेल्फ डिफेन्स सेंटरच्या एका कार्यक्रमाला नुकतीच प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. या कार्यक्रमातला एक व्हिडीओ त्यानं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अक्षय कुमारनं लिहिलं. डब्ल्यूएसडीसीच्या ग्रॅज्यूएशन डेला या लहान मुलीला भेटून खूप आनंद झाला. कदाचित हाच कॉन्फिडन्स आहे जो आमच्या टीमला नेहमी प्रेरणा देतो. अक्षयनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा दिसत आहेत. अंदमानमध्ये इलियानाचा बिकिनी अवतार, BOLD PHOTOS ची सोशल मीडियावर चर्चा
So happy to meet this young little girl at the graduation day of our Womens Self Defense Center today and it is this confidence in her to take on the world which encourages our team to keep going 👏👏 #WSDC @AUThackeray pic.twitter.com/Dv9ZEj4ea2
— Akshay Kumar (@akshaykumar) February 29, 2020
या व्हिडीओमध्ये अक्षय या मुलीला विचारतो, ‘तू सेल्फ डिफेन्स का शिकत आहेस? यावर ती मुलगी उत्तर देते मला फुटबॉल खेळायला आवडतं. मी अनेकादा खेळायचा प्रयत्न करते मला खेळता येत नाही. माझी आई म्हणते मी सेल्फ डिफेन्स शिकल्यावर मला फुटबॉल खेळता येईल. मी कोणत्याही खेळाडूशी भांडणार नाही. पण मी त्यांना सांगेन की, तुम्ही माझ्याशी लढू शकत नाही.’ सैफ-अमृता शेवटचे कधी भेटले होते? सारा अली खाननं केला आई-वडीलांबद्दल गौप्यस्फोट अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं प्रमोशन काही दिवसातच सुरू होईल. या सिनेमात अक्षय कुमार कतरिना कैफसोबत स्क्रिन शेअर करणार असून यात तो एका पोलिस ऑफिसरची भूमिका साकारत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं असून या सिनेमाचा ट्रेलर 2 मार्चला रिलीज होत आहे. या सुपरस्टार्सनी घरच्यांच्या विरोधात जाऊन केलं होतं लग्न, नावं ऐकूण व्हाल हैराण