Home /News /entertainment /

प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीला अटक, पैशांसाठी घेतला होता Porn Star होण्याचा निर्णय

प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीला अटक, पैशांसाठी घेतला होता Porn Star होण्याचा निर्णय

हॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर स्टीवन स्पीलबर्ग यांची मुलगी मिकेलानं 23 व्या वर्षी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकत सर्वांना धक्का दिला होता.

    मुंबई, 01 मार्च : काही दिवसांपूर्वी हॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर स्टीवन स्पीलबर्ग यांची मुलगी मिकेलानं 23 व्या वर्षी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकत सर्वांना धक्का दिला होता. याशिवाय त्यानंतर दिलेल्या एका मुलाखातीत तिच्या पालकांनी यामध्ये तिला पाठिंबा दिल्याचं म्हटलं होतं. तेव्हा पासून सगळीकडे तिची खूप चर्चा झाली होती. पण आता पुन्हा एकदा मिकेला वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. मिकेलाला घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली पोलीसांनी अटक केल्याचं म्हटलं जात आहे. मिकेलाचा होणारा नवरा चक पेनकोनं फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखती या वृत्ताला दुजोरा दिला. तो म्हणाला, हे सत्य आहे की मिकेलाला अटक करण्यात आलं होतं. मात्र हे गैरसमजातून झालं होतं. यामध्ये कोणाचंही नुकसान झालेलं नाही. पोलीसांनी तिला 29 फेब्रुवारी सकाळी 6.30 अटक केली. त्यानंतर तिला डिटेंशन सेंटरला नेण्यात आलं आणि मग तिला जामिनावर सोडण्यात आलं. टायगर श्रॉफच्या बहिणीनं बॉयफ्रेंडला केलं Lip Lock Kiss, फोटो शेअर करून म्हणाली.. काही दिवसांपूर्वी ‘द सन’नं दिलेल्या वृत्तानुसार मिकेलानं असा खुलासा केला होता की, पॉर्न इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीच तिनं तिचे सोलो पॉर्न व्हिडीओ शूट केले होते. जेव्हा तिनं तिच्या पालकांना पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा निर्णय सांगितला. तेव्हा त्यांनी तिच्या या निर्णयाचं समर्थन केलं. याशिवाय तिनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिच्या चाहत्यांनाही याबाबत सांगितलं होतं. तिचं म्हणणं आहे की, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी तिनं तिच्या करिअरवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. अंदमानमध्ये इलियानाचा बिकिनी अवतार, BOLD PHOTOS ची सोशल मीडियावर चर्चा या मुलाखतीत ती म्हणाली, मी नेहमीच सेक्शुअली खूपच सक्रिय आहे. ज्यामुळे मी याधीही खूप वेळा समस्येला तोंड दिलं आहे. मी कोणाला नुकसान पोहोचवलेलं नाही पण जेव्हा मी एखाद्या ठिकाणी जाते त्यावेळी तिथले लोक मला तिथं पाहून कम्फर्टेबल राहू शकत नाहीत. स्टीवन स्पीलबर्ग हे हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि स्क्रीप्ट रायटर आहेत. त्यांनी जुरासिक पार्क, 'इंडियाना जोंस', 'लिंकन' 'सॉ', 'शिंडलर्स लिस्ट' आणि 'सेविंग प्राइवेट रायन' या सिनेमांची निर्मिती केली आहे. त्यांच्या अनेक सिनेमांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. फोर्ब्स मासिकाच्या सर्व्हेनुसार स्टीवन यांची एकूण संपती 3.1 बिलियन डॉलर आहे. सैफ-अमृता शेवटचे कधी भेटले होते? सारा अली खाननं केला आई-वडीलांबद्दल गौप्यस्फोट
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Hollywood

    पुढील बातम्या