काही दिवसांपूर्वी एका फंक्शनमध्ये भागश्री म्हणाली, ‘अशी एक वेळ होती जेव्हा दीड वर्षासाठी मी आणि हिमालय एकमेकांपासून वेगळे झालो होतो. त्यावेळी माझ्या मनात असा विचारही आला की, जर ते मला भेटलेच नसते आणि मी त्यांच्याशी लग्न केलं नसतं तर. मला आजही आठवतं. हे सर्व जेव्हा मला आठवतं तेव्हा आजही मला खूप भीती वाटते.’ भाग्यश्रीच्या या खुलाशानं सर्वांना धक्का बसला होता. लग्नाच्या 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच भाग्यश्री तिच्या लग्नाविषयी मोकळेपणानं बोलली. टायगर श्रॉफच्या बहिणीनं बॉयफ्रेंडला केलं Lip Lock Kiss, फोटो शेअर करून म्हणाली.. भाग्यश्री आणि हिमालय यांच्या लव्ह स्टोरी बद्दल बोलायचं तर हे दोघं शाळेत असतानापासून एकमेकांना ओळखत होते. तेव्हाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र असं म्हटलं जातं की भाग्यश्रीचे कुटुंबीय तिच्या लग्नाच्या विरोधात होते. पण मग सूरज बडजात्या, सलमान खान आणि काही जवळच्या मित्रमंडळींनी त्यांचं लग्न लावून दिलं मात्र याचा भाग्यश्रीच्या करिअरवर परिणाम झाला. ‘मैंने प्यार किया’नंतर तिला बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळवता आलं नाही. अंदमानमध्ये इलियानाचा बिकिनी अवतार, BOLD PHOTOS ची सोशल मीडियावर चर्चा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Salman khan