मुंबई, 10 जून : टीव्ही सीरिलअल नंतर बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. पण आता ती एक वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. अंकितानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही असे फोटो शेअर केले आहेत. ज्यावरुन तिनं लॉकडाऊनमध्ये साखरपुडा उरकल्याचा अंदाज लावला जात आहे.
अंकिता मागच्या काही काळापासून तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबतच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत आहे. ती नेहमीच त्याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. पण काही दिवसांपूर्वी तिनं तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिच्या रिंग फिंगरमध्ये अंगठी पाहायला मिळत आहे. तिच्या बोटातली अंगठी पाहिल्यावर अनेकांनी अंकितानं लॉकडाऊनमध्ये गुपचूप साखरपुडा उरकल्याचे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.
भारतीय महिलांच्या सेक्शुअलिटीवर प्रश्न, ऐश्वर्याचं ओप्रा विन्फ्रेला सडेतोड उत्तर
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अंकितानं तिच्या लग्नाच्या प्लानविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. ती म्हणाली, मला आणखी खूप काम करायचं आहे. लग्नाच्या आधी मला बऱ्याच गोष्टी मिळवायच्या आहेत. मला लग्न तर करायचं आहेच पण त्याआधी मला एक सिनेमा करायचा आहे ज्यात मी मुख्य भूमिकेत असेन आणि तो सिनेमा माझा असेल मला लोक त्या भूमिकेसाठी लक्षात ठेवतील. लग्न करण्याआधी मी स्वतःसाठी काही गोष्टी ठरवल्या आहेत. मी मेहनती आहे, टॅलेन्टेड आहे आणि मला माहित आहे की, माझं हे स्वप्न सुद्धा पूर्ण होईल.
अंकिता लोखंडे विकी जैनच्या अगोदर सुशांत सिंह राजपूतला डेट करत होती. या दोघांची ओळख त्यांचा लोकप्रिय टीव्ही शो 'पवित्र रिश्ता'च्या सेटवर झाली होती. बराच काळ हे दोघं लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्येही होते. मात्र त्यांचं ब्रेकअप झालं आणि दोघं वेगळे झाले. अंकिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तिनं कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यानंतर तिनं टायगर श्रॉफ, दिशा पाटनी आणि रितेश देशमुख यांच्यासोबत ‘बागी 3’ मध्ये दिसली होती.
मीकानं नॅशनल टेलिव्हिजनवर कनिका कपूरला म्हटलं होतं पत्नी, वाचा नेमकं काय घडलं
भयानक अपघाताने बदललं अभिनेत्रीचं आयुष्य, चेहऱ्यात घुसले होते काचांचे 67 तुकडे