मुंबई, 19 जानेवारी : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी लवकरच नव्या सुनेचा गृहप्रवेश होणार आहे. अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा गोल धान अर्थात साखरपुडा आज पार पडला. अंबानीच्या अँटालिया या निवासस्थानी दोघांचा साखरपुडा सोहळा पार पडला. साखरपुड्यासाठी अँटालियाला मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. अनेक दिग्गज मंडळींनी अनंत अबांनीच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. मोठ्या थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीनं अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडला. दोघेही त्यांच्या महत्त्वाच्या प्रसंगी खूप खुश दिसले. साखरपुड्यासाठी गायिका श्रेया घोषालचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, क्रिकेटर्सनी अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. सचिन तेंडूलकर त्याची पत्नी,अभिनेता आमिर खान, किरण राव, ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन, अक्षय कुमार अँटिलियावर दाखल झाले होते. हेही वाचा - अनंत-राधिकाची एंगेजमेंट, पाहा काय असते पारंपरिक ‘गोल धना’ सेरेमनी साखरपुड्याआधी मुकेश अंबानी, नीता अंबानी यांच्यासह संपूर्ण अंबानी आणि मर्चंट कुटुंबानं एकत्रित फोटोशूट केलं. यावेळी राधिका आणि नीता अंबानी यांच्यातील खास बॉन्डिंग पाहायला मिळालं. राधिका ही अंबानी कुटुंबातील दुसरी भरतनाट्यम डान्सर आहे. नीता अंबानी या देखील उत्तम भरतनाट्यम डान्सर आहेत. काही महिन्यांआधीच राधिकाचा अरंगेत्रम सोहळा मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटर येथे पार पडला होता. त्यावेळी अंबानी कुटुंबातील नव्या सुनेची घोषणा करण्यात आली होती.
राधिकाचा मेहंदी सोहळा काल पार पडला. यावेळी राधिकानं सुंदर गुलाबी रंगाचा घागरा परिधान केला होता. राधिकाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. राधिकानं स्वत:च्या मेहंदी सोहळ्यात आलिया भट्टच्या घर मोरे परदेसीया या गाण्यावर सुंदर डान्स केला. अंबानींच्या घराची होणारी धाकटी सून राधिका मर्चंट ही शैला आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिकानं न्यूयॉर्क विद्यापीठाची पदवी संपादन केली आहे. तसंच एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते. काही महिन्यांआधीच तिनं भरतनाट्यत या नृत्यप्रकारात अंरग्रेत्रम पूर्ण केलं. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये राधिकाच्या अंरग्रेत्रमचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला होता.
राधिका ही अनेक वर्ष ‘श्री निभा आर्ट आर्ट फाउंडेशन’च्या संस्थापिका ‘गुरू भावना ठाकर’ यांच्याकडे भरतनाट्यमचं शिक्षण घेत आहे. राधिकाला ट्रेकिंग आणि स्विमींग करणं आवडतं. राधिका मर्चंट हिचे वडील विरेन मर्चंट ADFफूड्स लिमिटेड कंपनीचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आहेत. त्याचप्रमाणे ते एन्कोर हेल्थकेयर प्राइव्हेट लिमिटेड कंपनीचे सीईओ आणि वाइस चेअरमन आहेत.