मुंबई, 11 ऑगस्ट : मराठमोळी चंद्रमुखी म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर आता ‘झलक दिखला जा सिझन 10’ मध्ये आपले नृत्याची झलक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. टीव्हीवरचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘झलक दिखला जा सिझन 10’ चा एक प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार येत्या सप्टेंबर मध्ये सुरु होणाऱ्या या शो मध्ये अमृता सहभागी होणार हे आता कन्फर्म झालं आहे. अमृताने आतापर्यंत तिच्या नृत्याने मराठी प्रेक्षकांना तर भुरळ घातलीच आहे पण आता ती हिंदीमध्ये नाव कमावण्यास सज्ज झाली आहे. आता ही चंद्रमुखी या शो मध्येही आपल्या नृत्याचा ठसा उमटवणार हे नक्की. ‘झलक दिखला जा सिझन 10’ चा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये अमृता खानविलकर माधुरी दीक्षितसोबत थिरकताना दिसत आहे. या दोघीही मराठमोळ्या अभिनेत्री आता हा शो गाजवणार हे नक्की. या शोचा पहिलाच प्रोमो अमृता असलेला प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे आता हा शो बघण्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.
कलर्स वाहिनीने टाकलेल्या या प्रोमोवर अमृताने देखील कमेंट करत उत्सुकता दाखवली आहे. तिने लिहिलं आहे कि, ‘ज्या अभिनेत्री मुळे अभिनेत्री बनावं असं वाटायला लागलं ज्यांचं रूप … सौंदर्य … नृत्य अविस्मरणीय होतं .. आहे आणि राहणार अश्या माझ्या अतिशय लाडक्या अभिनेत्री बरोबर मला थिरकायला मिळालं. तुमची हि चंद्रा तिच्या चंद्रमुखी समोर नृत्य प्रदर्शन करायला सज्ज आहे मध्ये… नेहमी प्रमाणे तुमची साथ असुद्या’ अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. हेही वाचा - Jacqueline Fernandez: वाढदिवस साजरा करण्यासाठी जॅकलिन थेट पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनाला; Video व्हायरल ‘झलक दिखला जा सिझन 10’ पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. जेव्हापासून या डान्स रिऍलिटी शोच्या निर्मात्यांनी त्याच्या पुनरागमनाची अधिकृत घोषणा केली तेव्हापासूनच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या कार्यक्रमामध्ये चित्रपटसृष्टीतील विविध कलाकार सहभागी होतात. आता या सिजनमध्ये कोण कोणते कलाकार सहभागी होणार आहेत हे अजून गुलदस्त्यात आहे. पण मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चंद्रमुखी’ अमृता खानविलकर ‘झलक दिखला जा सिझन 10’ मध्ये सहभागी होणार निश्चित झाली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित या शोची जज असणार आहे.

)







