जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / BBM4: 'जे कधीही आग लावू शकतात'; अमृता फडणवीसाचं 'ते' वक्तव्य चर्चेत

BBM4: 'जे कधीही आग लावू शकतात'; अमृता फडणवीसाचं 'ते' वक्तव्य चर्चेत

अमृता फडणवीस

अमृता फडणवीस

‘बिग बॉस मराठी 4’च्या घरामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे तर त्यानिमित्ताने हा उत्साह द्विगुणित करायला काल घरामध्ये समाजसेविका, गायिका अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑक्टोबर : ‘बिग बॉस मराठी 4’ च्या घरामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे तर त्यानिमित्ताने हा उत्साह द्विगुणित करायला काल घरामध्ये समाजसेविका, गायिका  अमृता फडणवीस  यांनी हजेरी लावली होती. घरातील सदस्यांनी त्यांच्यासोबत खूप धमाल मस्ती केलेली पहायला मिळाली. स्पर्धकांनी काही प्रश्नही अमृता फडणवीस यांना विचारले. यावर त्यांनी मजेशीर उत्तरही दिली. त्यांची उत्तरं सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरली. अशातच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये किरण माने अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारताना दिसत आहे. कलर्स मराठीने अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, किरण माने अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारत आहे. किरण मानेंनी अमृता फडणवीसांना विचारलं, महाराष्ट्राचं एक राजकीय वर्तुळ आहे ते म्हणजे एक बिग बॉस आहे. तर त्यातले टॉप 5 सदस्य कोण वाटतात तुम्हाला. यावर अमृता फडणवीस म्हणतात, आपल्याला डॅशिंग लोक पाहिजे जे कधीही काही बोलू शकतात आणि आग लावू शकतात. पुढे किरण माने विचारतात आमच्यासारखे तुमच्यातही वाद होत असतील ना मी हे नाही करणार ते नाही करणार. यावर अमृता फडणवीस म्हणतात, ‘आपला नवरा हाती तर लागला पाहिजे ना काम द्यायला’.

जाहिरात

नुकताच आलेला हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे आजचा या भागातही अमृता फडणवीसांसोबत थोडा प्रश्न उत्तराचा कार्यक्रम पहायला मिळणार आहे. याशिवाय आजच्या भागात घरामध्ये भाऊबीज साजरी होणार आहे. यशश्री आणि समृद्धी योगेशला भाऊ मानतात तर ते आज भाऊबीज साजरी करणार आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, काल यशश्रीने अमृता फडणवीस यांना विचारले, तुमच्या कपलपैकी कोणाला वाटतं की तुम्ही बिग बॉसमध्ये असता तर जिंकला असता. यावर अमृता फडणवीस म्हणतात, ‘देवेंद्रजी जिंकू शकत नाही, त्यांना घरीच यायचंय ना शेवटी. देवेंद्रजी बिग बॉस आणि मी सगळे निर्णय घेणार’. त्यांचं हे स्टेटमेंट चांगलंच व्हायरल झालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात