मुंबई, 06 जानेवारी: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस काही ना काही कारणामुळे कायम चर्चेत असतात. बरेचदा त्यांच्या चर्चेत येण्याचं कारण त्यांचं गाणं हे असतं. त्या एक उत्तम गायिकाही आहेत. यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्यांची गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. त्यांचं ‘आज मैंने मूड बना लिया ए ए ए , तेरे नाल ही नचना वे’ हे नवं गाणं आज रिलीज झालं आहे. बऱ्याच दिवसांपासून या गाण्याची चर्चा होती. अखेर आज हे पूर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आता हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्याबरोबरच व्हिडीओमधील त्यांच्या ग्लॅमरस लूकची देखील चर्चा होत आहे. बॅचलर पार्टीतील कथानकावर हे गाणे आधारित आहे. नवीन गाण्यात अमृता गाण्याबरोबरच डान्सही करताना दिसत आहेत. तसेच संपूर्ण गाण्यात त्यांचे वेगवेगळे लूक देखील पाहायला मिळत आहेत. टी सिरीजच्या या गाण्याचा टिझर 5 जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासून चाहते या गाण्याची वाट पाहात होते. तसेच अमृता फडणवीस यांनीही तीन दिवसांपूर्वी त्यांच्या नवीन गाण्याचे पोस्टर सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले होते. हेही वाचा - Akshay Kumar: हेरा फेरी 3 नंतर ‘हा’ सिनेमाही गेला अक्षयच्या हातून; दिग्दर्शकांनी केली मोठी घोषणा अमृता फडणवीस यांच्या एका ट्वीटमुळे चाहत्यांमध्ये उत्साह आहे. काही पंजाबी ओळींसह अमृता फडणवीसांनी केलेलं हे ट्वीट चाहत्यांची उत्सुकता वाढवत आहे. यापूर्वी त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. हे गाणं पंजाबीत आहे. यासोबतच त्यांनी आपला वेस्टर्न ड्रेसमधला एक फोटोही शेअर केला होता.
या गाण्यासोबतच व्हिडीओमधील त्यांच्या ग्लॅमरस लूकचं देखील नेटकरी कौतुक करत आहेत. जीन्स, व्हाइट टॉप विथ पंजाबी स्टाइल जॅकेटवर अमृता यांनी ऑक्सडाइज ज्वेलरी कॅरी केली आहे. त्यांच्या लुकची सर्वत्र चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या व्यवसायाने बँकर आहेत पण त्यासोबतच त्यांची गाणी देखील हिट होत असतात. आता त्यांचं हे नवं गाणं देखील हिट होणार यात शंका नाही.
अमृता फडणवीस या एक बॅंकर असून त्यांना गायनाची आवड आहे. त्यांनी आतापर्यंत बरीच गाणी गायली असून त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली आहे.