मुंबई, 05 जानेवारी: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस काही ना काही कारणामुळे कायम चर्चेत असतात. बरेचदा त्यांच्या चर्चेत येण्याचं कारण त्यांचं गाणं हे असतं. त्या एक उत्तम गायिकाही आहेत. यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्यांची गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. त्यांचं ‘आज मैंने मूड बना लिया ए ए ए , तेरे नाल ही नचना वे’ हे नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या गाण्याचा टीझर सध्या समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्याबरोबरच व्हिडीओमधील त्यांच्या ग्लॅमरस लूकची देखील चर्चा होत आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या नवीन गाण्याचे बोल‘आज मैंने मूड बना लिया ए ए ए , तेरे नाल ही नचना वे’ असे असणार आहेत. ‘टी सीरिज’चं हे गाणं उद्या म्हणजेच ६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी त्यांच्या गाण्याचा एक टिझर सध्या समोर आला आहे. हा टीझर पाहून प्रेक्षक पार सैराट झाले आहेत. हेही वाचा - Amruta Fadnavis : ‘…मुड बना लिया’च्या आधी मिसेस उपमुख्यमंत्र्यांचे ‘हे’ धमाकेदार लुक्सही चर्चेत अमृता फडणवीस यांच्या या नव्या गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. अलिकडेच त्यांनी आपल्या या नव्या गाण्याचा पोस्टर शेअर केला होता. या पोस्टमधील त्याचा लूक पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं होतं. आतापर्यंत अमृता फडणवीस यांनी रोमँटिक प्रकारातील गाणी गायली आहेत. पण ‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए’ हे गाणं मात्र एक पार्टी सॉंग आहे. या गाण्याच्या टीझरवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी बल्ले बल्ले म्हणत त्यांच्या गाण्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Excited to meet y’all & make you #JoinTheBrideTribe !
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 5, 2023
Song releasing tomorrow…..Stay tuned.
Let the celebrations begin!
@TSeries #BhushanKumar @Avinash_galaxy @MehakGhai23 @meetbros @kumaarofficial @Ad7777Adil #teaser pic.twitter.com/N1rVib6rRe
अमृता फडणवीस यांच्या एका ट्वीटमुळे चाहत्यांमध्ये उत्साह आहे. काही पंजाबी ओळींसह अमृता फडणवीसांनी केलेलं हे ट्वीट चाहत्यांची उत्सुकता वाढवत आहे. यापूर्वी त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. हे गाणं पंजाबीत आहे. यासोबतच त्यांनी आपला वेस्टर्न ड्रेसमधला एक फोटोही शेअर केला होता.
या गाण्यासोबतच व्हिडीओमधील त्यांच्या ग्लॅमरस लूकचं देखील नेटकरी कौतुक करत आहेत. जीन्स, व्हाइट टॉप विथ पंजाबी स्टाइल जॅकेटवर अमृता यांनी ऑक्सडाइज ज्वेलरी कॅरी केली आहे. त्यांच्या लुकची सर्वत्र चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या व्यवसायाने बँकर आहेत पण त्यासोबतच त्यांची गाणी देखील हिट होत असतात. आता त्यांचं हे नवं गाणं देखील हिट होणार यात शंका नाही.