मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Amruta Deshmukh: मोस्टली सेन नंतर आता पुण्याची टॉकरवडी सांगतेय प्रोटेक्शन वापरण्याचे फायदे!

Amruta Deshmukh: मोस्टली सेन नंतर आता पुण्याची टॉकरवडी सांगतेय प्रोटेक्शन वापरण्याचे फायदे!

सध्या आरजे म्हणून पुण्याची टॉकरवडी (Punyachi Talkerwadi) उर्फ अमृता देशमुख सगळीकडे नावाजली जात आहे. अमृताने एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरचा विडिओ शेअर केला आहे.

सध्या आरजे म्हणून पुण्याची टॉकरवडी (Punyachi Talkerwadi) उर्फ अमृता देशमुख सगळीकडे नावाजली जात आहे. अमृताने एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरचा विडिओ शेअर केला आहे.

सध्या आरजे म्हणून पुण्याची टॉकरवडी (Punyachi Talkerwadi) उर्फ अमृता देशमुख सगळीकडे नावाजली जात आहे. अमृताने एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरचा विडिओ शेअर केला आहे.

  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 29 जून: अभिनेत्री आणि नव्याने आरजे झालेली अमृता देशमुख (Amruta Deshmukh) सध्या तिचं नवं वर्क लाईफ एन्जॉय करताना दिसत आहे. अमृता कायमचं तिचे आरजे म्हणून काम करतानाचे अनेक धमाल विडिओ शेअर करत असते. पण अमृताने नुकताच शेअर केलेला एक विडिओ एका महत्त्वाच्या विषयावर बोलणारा असून असा विडिओ समोर यायची गरज होती असं सांगितलं जात आहे.

अमृताने एका गंभीर विषयावर एक खास विडिओ तिच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. हा विडिओ कंडोमबद्दल जागृती करणारा असून आजच्या जनरेशनने कंडोमच्या वापराबद्दल जागरूक असणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यात ती सांगते. (Amruta Deshmukh instagram) अमृता इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असते. एक कलाकार म्हणून तिला खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे. ती एक इन्फ्लुएन्सर सुद्धा आहे. तिच्या याच इन्फ्लुएन्सर पावरचा योग्य उपयोग करून तिने एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करत जनजागृती करायचा प्रयत्न केला आहे.

‘आजचं युथ हे स्वतःच्या आरोग्याशी निगडित बाबींबद्दल बरंच जागरूक आहे. स्वतःच्या आरोग्याबद्दल काळजी घ्यायला लाज कशाला वाटायला हवी? अनेकदा सेक्स हा विषय आला की बापरे यावर नेमकं काय आणि कसं बोलायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. याबद्दल काहीजण कचरताना दिसतात. मात्र सेक्स हा आपल्या आजूबाजूला होणारा एक नैसर्गिक प्रकार आहे. कॅज्युअल असो किंवा सिरीयस सेक्स हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे त्यामुळे त्याबद्दल बोलण्यात लाज बाळगू नये. कंडोमबद्दल बोलताना कोणताही लाजेचा किंवा शंकेचा पडदा असू नये.’ असं ती या व्हिडिओमधून सांगते.

आजच्या युथला आवाहन करत कंडोमबद्दल आणि सेक्शुयल हेल्थबद्दल जास्तीत जास्त जागरूकता पसरली पाहिजे असं ती या व्हिडिओमध्ये सांगते. सध्या कंडोम या विषयाबद्दल बरेच चित्रपट सुद्धा येताना दिसत आहेत ज्यातून या विषयावर असलेला अनावश्यक लाजेचा पडदा दूर होईल आणि याच महत्त्व लोकांना समजेल.

हे ही वाचा- अनन्यामध्ये दिसणार वाघाचा Swag; महाराष्ट्राच्या क्रशसोबत झळकणार अभिनेता

 मागे सुद्धा विषय खोल या युट्युब चॅनेलकडून असाच एक विडिओ बनवला होता. यात ‘तरुणांचे संस्कारवर्ग’ या खास सिरीजमध्ये फेमस युट्युबर प्राजक्ता कोळी उर्फ मोस्टली सेन सेक्स एजुकेशन आणि कंडोम आणि त्याबद्दल असलेल्या गैरसमज याबद्दल बेधडकपणे बोलताना दिसली. आजच युथ बर्थ कंट्रोलबद्दल जागरूक आहे असा संदेश त्यामध्ये होता. आता हंसाचं अर्थाचा विडिओ अमृताने सुद्धा पोस्ट केल्याने तिचं कौतुक होत आहे आणि कमेंट्समध्ये चाहते त्यांचे सेक्श्युल हेल्थबद्दलचे विचार मांडताना दिसत आहेत.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Pune, Sex education, Sexual wellness